ओवेसींसमोर पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या अमुल्याला अटक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल

ओवेसींसमोर पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या अमुल्याला अटक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल

AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेत गुरुवारी गोंधळ उडाला. एका तरुणीने थेट व्यासपीठावरून 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या.

  • Share this:

बंगळुरु 21 फेब्रुवारी : AMIMचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांच्या समोर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाऱ्या देणाऱ्या तरुणीला पोलिसांनी अटक केलीय. अमुल्या असं या मुलीचं नाव आहे. पोलिसांनी तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय. अटकेनंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलंय. कोर्टाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बंगलुरुमध्ये CAA विरोधी रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली होती. या घटनेमुळे वाद निर्माण झाला असून ओवेसींवर चौफेर टीका करण्यात येत आहे.

बंगळुरात नेमकं काय झालं?

CAA-NRC विरोधात ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुसलमीन अर्थात AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेत गुरुवारी गोंधळ उडाला. एका तरुणीने थेट व्यासपीठावरून 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. तरुणीचे नाव अमूल्या असे सांगितले जात आहे. यानंतर सभेच्या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला. तातडीने संबंधित तरुणीला व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आले. त्यावर असदुद्दीन ओवेसी म्हणाले, 'भारत जिंदाबाद था और रहेगा', आम्ही 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणेचे समर्थन करत नाही.

ठाकरे सरकारला मोठा धक्का, राज्यपालांनी फेटाळली महत्त्वाची शिफारस

सभेत असदुद्दीन ओवेसी भाषण करण्यासाठी उभे राहिले असता अमूल्या हिने माईक हातात घेऊन 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. तिला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, तिने तिचे बोलणे सुरूच ठेवले होते. तरुणीने व्यासपीठावर येत तुम्हाला 'पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद फरक सांगते', असे सांगत 'पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या.

गंमत कराल तर जंमतच करून टाकेल, अजितदादांनी उपटले कार्यकर्त्यांचे कान, VIDEO

ती घोषणा देत असताना खुद्द ओवेसींनी धावत जाऊन तिला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी तिला थांबवले आणि तिच्या हातातून माईक हिसकावून नंतर तिला व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आले. संबंधित तरुणी सेव्ह कॉन्स्टिट्यूशन नामक संस्थेतर्फे व्यासपीठावर बोलण्यासाठी बोलावण्यात आले होते.

First published: February 21, 2020, 10:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading