मुंबई, 3 फेब्रुवारी : अमूलच्या जाहिराती नेहमीच काळानुरूप कधी उद्बोधक तर कर खरमरीत भाष्य करणाऱ्या असातात. ताज्या घडामोडींची दखल घेण्याची खास अमूलच्या जाहिरातींची खास शैली आहे. या शैलीला अनुसरूनच अमूलने एक नवी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अमूल दुधाची जाहिरात विंग कमांडर अभिनंदन यांच्या शौर्याला सलाम करतेच, पण जर हटके पद्धतीने.
विंग कमांडर अभिनंदन यांच्या परतण्यावर अमूल गर्लने एकदा भाष्य केलेलं आहे. आता त्यांचा हा नवा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे आणि व्हायरल होत आहे. अभिनंदनच्या मिशांवरून प्रेरणा घेऊन हा व्हिडिओ तयार झाला आहे.
अमूल मूछ : #Amul Mooch: To Abhinandan from Amul! या नावाने अमूलने ट्विटरवर हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि 24 तासात तो दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिला.
#Amul Mooch: To Abhinandan from Amul! pic.twitter.com/NAG3zNMlIL
— Amul.coop (@Amul_Coop) March 2, 2019
विंग कमांडर अभिनंदन देशवासियांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. देशवासी त्यांना आपला आदर्श मानून लागले आहेत. इतकंच काय तर त्यांच्या प्रमाणे मिशी ठेवण्याकडे देखील आता तरूणांचा कल दिसून येतोय. बंगळूरूमधील एका तरूणानं त्यांच्यासारखी मिशी ठेवली असून अभिनंदन माझ्यासाठी रिअल हिरो असल्याची भावना त्यांनं बोलून दाखवली आहे. मोहम्मद चंद असं या तरूणाचं नाव आहे.
पाकच्या विमानाचा पाठलाग करताना मिग - 21 क्रॅश झालं. त्यानंतर विंग कमांडर अभिनंदन पॅराशूटच्या साहाय्याने पाकिस्तानमध्ये उतले. त्याठिकाणी देखील त्यांनी जमावाला अत्यंत धौर्यानं तोंड दिलं. शिवाय, नकाशे नष्ट करण्यामध्ये देखील महत्त्वाची भूमिका निभावली. पाकिस्तान सैन्यानं त्यांना ताब्यात घेतल्यानंतर देखील नियमांप्रमाणे उत्तरे दिली. अखेर पाकिस्ताननं दबावापुढे झुकत विंग कमांडर अभिनंदन यांना भारताच्या हवाली केलं. त्यामुळे देशात आनंदाचं वातावरण आहे.