अमूल दूध इतक्या रुपयांनी महागलं, उद्यापासून नवे दर लागू

देशातील प्रसिद्ध असलेल्या 'अमूल' ब्रँडनं दुधाच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 20, 2019 05:54 PM IST

अमूल दूध इतक्या रुपयांनी महागलं, उद्यापासून नवे दर लागू

नवी दिल्ली, 20 मे : देशातील प्रसिद्ध असलेल्या 'अमूल' ब्रँडनं दुधाच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अमूल दुधाच्या दरात 21 मेपासून दोन रुपयांनी वाढ होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. गुजरात को-ऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (GCMMF) संचालक आर. एस. सोधी यांनी दूध दरवाढीबाबतची माहिती दिली आहे. यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार आहे.


वाचा : ...तर नरेंद्र मोदी नाही BJPच्या दुसऱ्या नेत्याला मिळणार पंतप्रधानपदाची संधी?यापूर्वीही, अमूल कंपनीनं दुधाच्या दरामध्ये वाढ केली होती. आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं 'अमूल' कंपनीनं दुधाचे दर 10 रुपयांनी वाढवले होते. कंपनीच्या या निर्णयामुळे अमूल डेअरीशी संलग्न असणाऱ्या 1,200 दूध संघटनांमधील सात लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झाला.

वाचा : VIDEO : पंतप्रधान होणार का? नितीन गडकरींचं मोठं विधान

EXCLUSIVE: 'नवनीत राणा नही आँधी हैं, दूसरी इंदिरा गांधी हैं...' पाहा UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 05:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...