मराठी बातम्या /बातम्या /देश /

चीनविरोधात केलेल्या जाहिरातीमुळे अमूल अडचणीत; ट्विटरने अकाऊंट केलं ब्लॉक, दिलं हे कारण

चीनविरोधात केलेल्या जाहिरातीमुळे अमूल अडचणीत; ट्विटरने अकाऊंट केलं ब्लॉक, दिलं हे कारण

अमूलचे विविध विषयांवरील कार्टून कायमच चर्चेत असतं. शिवाय त्यातून तत्कालिन विषयावर भाष्यही केलेलं असतं

अमूलचे विविध विषयांवरील कार्टून कायमच चर्चेत असतं. शिवाय त्यातून तत्कालिन विषयावर भाष्यही केलेलं असतं

अमूलचे विविध विषयांवरील कार्टून कायमच चर्चेत असतं. शिवाय त्यातून तत्कालिन विषयावर भाष्यही केलेलं असतं

    नवी दिल्ली, 6 जून : भारत-चीन सीमा वादावर कमांडर स्तरावर चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे, दुग्धजन्य पदार्थ म्हणून जागतिक ओळख बनवणाऱ्या अमूलचे ट्विटर हँडल ट्विटरने बंद केले होते. काही काळाने ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. अमूलने 'एक्झिट द ड्रॅगन' पोस्ट केल्यानंतर ट्विटरने कंपनीचे खाते ब्लॉक केले होते. अमूलचे ट्विटर हँडल ब्लॉक झाल्यानंतर यावर लोकांनी निषेध केला होता. सोशल साईटवर लोकांनी अनेक प्रकारचे फोटो, व्हिडीओ आणि संदेश लिहून खाते सुरू  करण्याची मागणी केली होती. अमूल यांनी केली होती ही पोस्ट अमूलने चायना मिलिटरी- 'एक्झिट द ड्रॅगन' या विषयावर क्रिएटिव्ह पोस्ट केली होती. या क्रिएटिव्हच्या कॅप्शनमध्ये अमूलने कॅम्पेन चालवित लिहिले होती की, - About the boycott of Chinese products…(चिनी उत्पादनांच्या बहिष्काराबद्दल…) अमूलने चीन विरोधात चालवले होते अभियान अमूल टोपिकलमध्ये लाल आणि पांढऱ्या पोशाखात बसलेल्या अमूल गर्लला ड्रॅगनशी झुंज देऊन आपला देश वाचविताना दाखविण्यात आले. याच्या मागे चिनी व्हिडीओ-शेअरिंग मोबाइल अ‍ॅप टिकटॉकचा लोगोही दिसू शकतो. याखेरीज या क्रिएटिव्हमध्ये अमुल हा 'मेड इन इंडिया' ब्रँड असल्याचे मोठ्या अक्षरे लिहिले आहे आणि त्यांचे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वावलंबी (Made in India) मोहिमेवर आहे. ट्विटरने दिले स्पष्टीकरण त्याच वेळी या संपूर्ण प्रकरणात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आर एस सोधी म्हणाले की, 4 जून रोजी आमचे खाते ब्लॉक केले गेले होते. काही प्रोटोकॉल नंतर, ते पुन्हा सक्रिय केले गेले. ट्विटर इंडियाचे एमडी मनीष माहेश्वरी यांच्या मते, अमूलचे ट्विटर अकाउंट काही ट्वीटमुळे नव्हे तर काही तांत्रिक कारणांमुळे बंद करण्यात आले होते. हे वाचा-रुग्णसेवा प्रथम कर्तव्य! Covid उपचारासाठी डॉक्टरांनी पुढील शिक्षणाला दिला विराम
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: China

    पुढील बातम्या