अमृतसर,ता.19 ऑक्टोबर : अमृतसरच्या रावण दहन आणि रेल्वे अपघातानं सर्व देश हादरून गेलाय. या अपघातात 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. तर 100 लोकांवर अमृतसरच्या विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत. रावण दहन पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या लोकांच्या अनेक ह्रदयद्रावक कहाण्या आता पुढं येताहेत. या मैदानावर उपस्थित एक व्यक्ती रावण दहनाचा कार्यक्रम आपल्या कुटुंबियांना व्हिडीयो कॉलच्या माध्यमातून दाखवत होता. त्याचे कुटुंबियही ती दृश्य बघत होती. बघता बघता त्या फोन कॉलवर त्यांनी जे बघितलं त्या दृश्यांनी ते कुटुंबिय हादरून गेलं, सुन्न झालंय.
या कार्यक्रमाला एक व्यक्ती आपल्या कुटुंबियांना घेऊन जाणार होता. मात्र काही कारणांमुळे त्यांच्या घरची मंडळी येवू शकली नाही. त्यामुळं रावण दहन तुम्हाला व्हिडीओ कॉलवरून दाखवतो असं त्यांनी आपल्या घरच्या मंडळींना सांगितलं.
जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा त्यांनी व्हिडीओ कॉल करून दहन आणि आतषबाजी घरच्या मंडळींना दखवली. तेही आनंदानं ती दृष्य बघत होती. मात्र पुढच्या काही सेंकदात काय बघायला मिळणार याची त्यांना कल्पानाही केली नसेल.
काह मिनिटं होत नाही तोच आतषबाजीच्या दृश्यांची जागा किंकाळ्यांनी घेतली. एक भरधाव ट्रेन लोकांना चिरडत जातेय असं दृश्य त्यांनी पाहिलं आणि व्हिडीयो कॉल बंद पडला. कारण घटनास्थी प्रचंड गोंधळ उडाला होता. काहीतरी अपघात घडला याची त्यांना कल्पना आली मात्र नेमकं काय झालं हे त्यांना कळत नव्हतं.
त्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला पण फोन लागत नव्हता. त्यामुळं त्यांची चिंता आणखी वाढली. थोड्याच वेळात व्हॉट्सअपवर फोटो आणि व्हिडीओ यायला लागले. त्यांनी टी.व्ही. लावला तेव्हा घटनास्थळी नेमकं काय झालं हे त्यांना कळालं आणि ते हादरून गेले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amritsar train accident, Punjab, Ravan dhahan, Train accident live visuals, Video call