अमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस

अमृतसर स्फोटातील हल्लेखोरांचे फुटेज मिळाले, माहिती देणाऱ्यांना ५० लाखांचे बक्षीस

अमृतसर जवळच्या अदनाला गावातल्या निरंगारी भवनमध्ये सत्संगमध्ये स्फोट झाला होता.

  • Share this:

पंजाब, 19 नोव्हेंबर :  अमृतसरमध्ये अजनाला गावात निरंकारी सत्संगच्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 3 जणांचा मृत्यू झाला. आता या स्फोटातील हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.


हल्ला करणारे दोघे जण हे एका दुचाकीवरून आले होते. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला होता त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोघे जण कैद झाले. तोंडाला कापड गुंडाळले २ हल्लेखोर पसार झाले होते.


अमृतसर जवळच्या अदनाला गावातल्या निरंगारी भवनमध्ये सत्संगमध्ये स्फोट झाला होता. हल्लेखोरापैकी एकाने जिन्स आणि शर्ट घातले होते. तर दुसऱ्याने कुर्ता आणि पायजमा घातला होता. न्यूज 18 नेटवर्क मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हे पल्सर या दुचाकीवरून आले होते. त्या दुचाकीला नंबर प्लेट नव्हती.


प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार दोन मुलं दुचाकीवर आली आणि त्यांनी कार्यक्रमात गर्दीची जागा पाहिली आणि बॉम्ब फेकून तिथून पळ काढला होता. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी हल्लेखोरांची माहिती देणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसंच पोलिसांनी १८१ हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.


दरम्यान, अमृतसरजवळ निरंकारी भवनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय चा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही असं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितलं. आयएसआय समर्थित खालिस्तानी अतिरेकी संघटनांनी हा स्फोट घडवला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. त्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या या मताला महत्व प्राप्त झालंय.=============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2018 01:40 PM IST

ताज्या बातम्या