Amazon आगीच्या भक्ष्यस्थानी, नेटकरी Google वर भडकले

Amazon आगीच्या भक्ष्यस्थानी, नेटकरी Google वर भडकले

जगातील सर्वात मोठे जंगल असलेल्या अॅमेझॉनला गेल्या 15 दिवसांपासून आग लागली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : पृथ्वीवरील एकूण ऑक्सिजनच्या 20 टक्के ऑक्सिजन निर्मिती होत असलेलं अॅमेझॉनचं जंगल गेल्या 16 दिवसांपासून जळत आहे. याची बातमी आतापर्यंत कोणत्याही आंतरराष्ट्रीय माध्यमातून आली नव्हती. इतकंच काय अजुनही अॅमेझॉन फायर असं गुगलवर सर्च करायला गेलं तरी अॅमेझॉनची उत्पादनं आणि त्याची माहिती समोर येते. जगातील सर्वात मोठी इ कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉनची उत्पादनं दाखवत असल्यानं युजर्स गुगलवर भ़डकले आहेत.

अॅमेझॉनचं जंगल जळत असल्याचे अनेक फोटो ट्विटरवर व्हायरल होत आहेत. यासाठी आता नदीच्या नावावरून आपल्या कंपनीचं नाव अॅमेझॉन ठेवलेल्या जेफ बेजोस यांनी जंगल वाचवण्यासाठी पुढे यावं अशी मागणी केली जात आहे. गुगलवर Amazon Fire सर्च करताच अॅमेझ़ॉनची उत्पादनं दिसतात. त्यामध्ये Amazon Fire TV, Fire Tablet दाखवत आहे. युजर्सनी गुगलवर राग काढला आहे.

गुगललासुद्धा फक्त फायद्याचं पडलं आहे असंही काही युजर्सनी म्हटलं आहे. अॅमेझॉन जळत असतानासुद्धा त्याबदद्लच्या न्यूज न दाखवता गुगलने अॅमेझॉनच्या उत्पादनांना प्राधान्य दिलं असल्याचंच दिसत आहे.

ब्राझीलमधील जंगलात ही आग पसरली असून गेल्या 15 दिवसांत 9 हजारहून अधिक वणवे पेटले आहेत. अॅमेझॉनमध्ये जुलै ते ऑक्टोंबर या काळात उन्हाळा असतो. या महिन्यांमध्ये वणवा पेटण्याच्या घटना घडत असतात. मात्र सध्या लागलेली आग प्रचंड असून दिवसाही गडद रात्रीसारखं वातावरण झालं आहे. ब्राझीलमध्ये 20 ऑगस्टपासून आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

अॅमेझॉनमधील या आगीमुळे अॅमेझॉन, रॉण्डोनिया, पॅरा आणि मॅटो ग्रोसो या भागात मोठा फटका बसला आहे. जंगलातील आगीमुळे धुराचे लोट पसरले असून शहरांवर दिवसाही अंधाराचे साम्राज्य आहे.

अॅमेझॉन जंगलाला पृथ्वीचं फुफ्फुस असंही म्हटलं जातं. पृथ्वीच्या 20 टक्के ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या अॅमेझॉनमुळं ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यात मोलाचा वाटा आहे. अॅमेझॉनला लागलेली आग लवकर कमी व्हावी यासाठी #PrayForTheAmezon असा हॅशटॅग वापरून प्रार्थना केली जात आहे.

SPECIAL REPORT: प्रेमी युगुलाला अमानुष मारहाण; गावकऱ्यांनी काढली धिंड

Published by: Suraj Yadav
First published: August 23, 2019, 9:09 AM IST
Tags: amazon

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading