नवी दिल्ली, 06 ऑगस्ट: नवी दिल्लीत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली आहे. गुरुवारी दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली आहे. या भेटीनंतर अमोल कोल्हे यांनी खास फोटो पोस्ट करत ट्विट केलं आहे. संजय राऊत यांची भेट नेहमीच पर्वणी असते. त्यांच्या मार्गदर्शनाच्या नक्कीच लाभ होईल, असं अमोल कोल्हे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सध्या दिल्लीत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान भेट झाल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेला रामराम केल्यानंतर अमोल कोल्हे आणि संजय राऊत यांचीही पहिली भेट आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब यांची भेट झाली.त्यांची भेट ही नेहमीच पर्वणी असते.महाविकास आघाडी, मतदारसंघातील प्रकल्प अशा अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा करता आली. मतदारसंघात 'महाविकास आघाडी' म्हणून काम करताना राऊत साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होइल. @rautsanjay61 pic.twitter.com/hZvziKUHhx
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 5, 2021
अमोल कोल्हे यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब यांची भेट झाली.त्यांची भेट ही नेहमीच पर्वणी असते.महाविकास आघाडी, मतदारसंघातील प्रकल्प अशा अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा करता आली. मतदारसंघात 'महाविकास आघाडी' म्हणून काम करताना राऊत साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होईल.
हेही वाचा- भेटीनंतर चंद्रकांत पाटील दिल्लीला तर राज ठाकरे पुण्याला रवाना
लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीसाठी शिरुर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे आढळराव पाटील यांचा पराभव करुन निवडणूक जिंकली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCP, Sanjay Raut (Politician), Shivsena