जम्मू काश्मीरचा नकाशा बदलणार, मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय

जम्मू काश्मीरचा नकाशा बदलणार, मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं 370 कलम हटवण्याची शिफारस करण्यात आली असून 35 ए सुद्धा रद्द करण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 ऑगस्ट : जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्यात आलं आहे. यामुळं जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा राहणार नाही. 370 शिवाय 35 ए सुद्धा हटवण्यात आलं आहे. गृहमंत्री अमित शहांनी संसदेत याबाबत प्रस्ताव मांडला होता. जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. शहांच्या प्रस्तावावेळी विरोधकांनी गदारोळ केला.

जम्मू काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश होणार आहे. काश्मीरपासून लडाख वेगळं होणार आहे. लडाखसुद्धा केंद्रशासित प्रदेश होणार आहे. काश्मीरचा स्वतंत्र राज्याचा दर्जा यामुळं संपुष्टात येईल.

काय आहे 35 'ए'

14 मे 1954मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या आदेशावरून कलमाचा समावेश करण्यात आला. संविधानातील कलम 370 अंतर्गत हा अधिकार देण्यात आला आहे. आर्टिकल 35A अंतर्गत जम्मू - काश्मीरबाहेरील व्यक्तिला संपत्ती खरेदी करता येत नाही. या कलमातंर्गत राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळत नाही.

VIDEO: नेते नजरकैदेत, कलम 144 लागू; काय आहे जम्मूची आताची स्थिती?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 11:49 AM IST

ताज्या बातम्या