अमिताभ बच्चन यांची शेतकऱ्यांना साथ, फेडणार 4 कोटींचं कर्ज

अमिताभ बच्चन यांची शेतकऱ्यांना साथ, फेडणार 4 कोटींचं कर्ज

या 1398 शेतकऱ्यांचं कर्ज अमिताभ यांच्याकडून फेडलं जाणार आहे त्यापैकी 70 शेतकऱ्यांना ते स्वखर्चानं मुंबईला आणणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी उत्तर प्रदेशच्या 1398 शेतकऱ्यांची कर्ज फेडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचं जाहीर केलं आहे. यासाठी अमिताभ यांनी यासाठी विविध बँकांना एकूण 4 कोटी रुपये दिले असल्याची माहिती आहे.

काही महिन्यांपूर्वीच बीग बी अमिताभ बच्चन यांनी शेतकऱ्यांचं कर्ज फेडण्याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर आता ही प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

ज्या 1398 शेतकऱ्यांचं कर्ज अमिताभ यांच्याकडून फेडलं जाणार आहे त्यापैकी 70 शेतकऱ्यांना ते स्वखर्चानं मुंबईला आणणार आहेत. यासाठी ट्रेनचा एक डबा बूक करण्यात आला आहे. मुंबईत येणाऱ्या शेतकऱ्यांना 26 नोव्हेंबरला अमिताभ स्वतः  बँकेची पावती हातात देतील.

याआधी अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राच्या 358 शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं होतं. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या ह्रदयात स्थान निर्माण केलेल्या महानायक बीग बी यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या या निर्णयामुळे त्यांच्या संवेदनशीलपणावरही एक प्रकारे मोहर उमटवली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातही काही अभिनेत्यांकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत काम केल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेते आमीर खान यांच्याकडून 'पानी फाऊंडेशन'च्या माध्यमातून पाण्याच्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होतोय, तर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे अभिनेत आपल्या 'नाम फाऊंडेशन'च्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारची मदत करताना पाहायला मिळत आहेत.

VIDEO : मत मागण्यासाठी आलेल्या भाजप उमेदवाराला घातला चपलांचा हार

<iframe class="video-iframe-bg-color" onload="resizeIframe(this)" id="story-318041" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzE4MDQx/"></iframe>

First published: November 22, 2018, 8:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading