अमिताचा झाला आदित्य; गायिकेनं लिंग बदलाची शस्त्रक्रिया करुन मिळवली नवी ओळख

अमिताचा झाला आदित्य; गायिकेनं लिंग बदलाची शस्त्रक्रिया करुन मिळवली नवी ओळख

समाजाने लिंग बदल करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींच्या पाठिशी उभं राहावं असं आवाहन आदित्य पटेलने (Aditya Patel) केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर: गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात एका गायिकेनं जेंडर बदललं आहे. अमिता पटेल ही तरुणी भजन गात असे. कॉलेजमध्ये गेल्यावर तिला आपल्या शरीरामधील बदल जाणवू लागले. आपण कॉलेजमधील मित्रांसारखेच आहोत असं तिला वाटायला लागलं. तिने लिंग बदलण्याचा निर्णय घेतला. आता अमिताची ओळख बदलली आहे. आदित्य पटेल या नावाने तो ओळखला जातो.

31 जानेवारी 1994 रोजी एका छोट्याच्या गावामध्ये अमिताचा जन्म झाला. लहान असताना अमिता अगदी सामान्य मुलीप्रमाणे जीवन जगत होती. शाळेचं संपूर्ण शिक्षण तिने मुलगी म्हणूनच घेतलं. थोडी मोठी झाल्यानंतर तिने भजन गायिका म्हणून कामालाही सुरुवात केली. पण कॉलेजमध्ये असताना तिला स्वत:मध्ये काही बदल जाणवू लागले. मुलगी म्हणून आयुष्य जगण्यापेक्षा तिला मुलगा व्हावसं वाटायला लागलं.

धीर करुन कुटुंबाशी संवाद

आपल्यासोबत काहीतरी वेगळं घडत आहे हे अमिताला जाणवत होतं. हिंमत करुन तिने स्वत:ची अवस्था कुटुंबियांना सांगितली. सुदैवाने तिच्या कुटुंबियांनीही तिला पूर्ण पाठिंबा दिला. लिंग बदलाची शस्त्रक्रिया करण्यासाठी अमिताला दिल्ली गाठावी लागली. सगळे रिपोर्ट् तपासून डॉक्टरांनी तिला हार्मोंसमधील बदलाच्या गोळ्या सुरू करायला सांगितल्या. गेल्याच वर्षी तिच्यावर लिंग बदलाची शस्त्रक्रियादेखील झाली आहे. अमिताचं आता मुलामध्ये परिवर्तन झालं आहे. आदित्य पटेलने कायद्यानेही आपलं नाव बदललं आहे.

लिंग बदल प्रक्रियेबद्दल आजही आपल्या समाजात आक्षेप घेतले जातात. हे निसर्गाच्या विरोधात आहे असं म्हणून काही लोक या गोष्टीला विनाकारण विरोध करतात. पण समाजाने अशा व्यक्तींना पाठिंबा द्यावा असं आवाहन आदित्यने केलं आहे. समाजाने लिंग बदल करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींच्या पाठिशी उभं राहावं असं आवाहन आदित्यने केलं आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 29, 2020, 9:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading