नवी दिल्ली, 2 जुलै : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसमवेत राजधानी दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागात कोविड - 19 च्या वाढत्या संसर्गाबद्दल बैठक घेतली. दिल्ली आणि नॅशनल कॅपिटल रीजन (एनसीआर) मध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची झपाट्याने वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी परिस्थितीशी सामना करण्यासाठी आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी पावले उचलली आहेत.
गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली-एनसीआरमधील कोविड - 19 च्या स्थितीचा आढावा घेतला. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हेही या बैठकीस उपस्थित होते. एनसीआरमध्ये हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील काही जिल्हे आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्ध नगर (नोएडा), गाझियाबाद आणि हरियाणामधील गुडगाव आणि फरीदाबाद यांचा समावेश आहे.
हे वाचा-‘टायगर अभी जिंदा है’ ज्योतिरादित्य शिंदेंचं काँग्रेस नेत्यांना दबंगस्टाइल उत्तर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीला हजेरी लावली.
दिल्लीत 89,000 लोकांना कोरोनाचा संसर्ग
बुधवारपर्यंत दिल्लीत 89,००० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि 2803 जणांचा मृत्यू झाला आहे. कोविड – 19 ची प्रकरणे उत्तर प्रदेशात वाढून 24056 वर पोहोचली आहेत, तर आतापर्यंत 718 लोकांचा मृत्यू झाला आहे. एनसीआरमध्ये राज्यातील गौतम बुध नगर जिल्ह्यात आतापर्यंत 2,362 घटना समोर आल्या असून 22 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर गाझियाबादमध्ये आतापर्यंत 851 संक्रमणाची प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि 56 लोकांचा मृत्यू झाला आहे.