मराठी बातम्या /बातम्या /देश /

ममता बॅनर्जींना घेरण्यासाठी अमित शहांनी केला महाराष्ट्राचा दौरा रद्द!

ममता बॅनर्जींना घेरण्यासाठी अमित शहांनी केला महाराष्ट्राचा दौरा रद्द!

शनिवारी कोलकत्यात झालेल्या शक्तिप्रदर्शनानंतर अमित शहा काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

शनिवारी कोलकत्यात झालेल्या शक्तिप्रदर्शनानंतर अमित शहा काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

शनिवारी कोलकत्यात झालेल्या शक्तिप्रदर्शनानंतर अमित शहा काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मुंबई 21 जानेवारी : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा कोल्हापूर आणि सांगलीचा दौरा रद्द झाला आहे. शहा हे 24 जानेवरीला सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. मात्र शहा यांना स्वाईन फ्लू झाल्याने त्यांना आठवडाभर दिल्लीतल्या 'एम्स'मध्ये उपचारासाठी दाखल रहावं लागलं होतं. त्यामुळे त्यांच्या सर्व कार्यक्रमांमध्ये बदल झाले आहेत. मात्र मंगळवारी होणाऱ्या त्यांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यात कुठलाही बदल करण्यात आला नाही.

शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यात या दोन जिल्ह्यातल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठी-भेटी घेणार होते. तसच राज्यातल्या नेत्यांनाही भेटणार होते. मात्र त्यांच्या सर्वच कार्यक्रमांची फेररचना झाल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपने पूर्ण जोर लावला आहे.

अमित शहा यांना 16 जानेवारीला स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्याची माहिती खुद्द शहा यांनी टि्वटरवर दिली होती. 'मला स्वाईन फ्लूची लागण झाली असून उपचार सुरू आहे. देवाची कृपा आणि तुमच्या सगळ्याच्या प्रेमामुळे मी लवकरच बरा होईल', असं शहा यांनी टि्वटकरून सांगितलं आहे.

भाजपच्या रथयात्रेला कोर्टानं परवानगी नाकारली होती. त्यामुळे अमित शहा तिथे जाहीर सभा घेणार आहेत. शनिवारी कोलकत्यात झालेल्या शक्तिप्रदर्शनानंतर अमित शहा काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेस -भाजप वाद

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने कुठल्याही विषयाचं राजकारण करायला राजकीय पक्षांना फक्त निमित्तच हवं असतं. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लुची लागण झाली. त्यांच्यावर सध्या 'एम्स'मध्ये उपचार सुरू आहेत. ही माहिती खुद्द अमित शहांनीच ट्विटवरून दिली होती. त्यावर काँग्रेसचे नेते बी.के. हरिप्रसाद यांनी दिलेली प्रतिक्रिया आता वादाचं कारण ठरली होती.

हरिप्रसाद म्हणाले, कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याची अमित शहांना घाई झाली होती. पण काँग्रेसचे आमदार परत आल्याने त्यांना धक्का बसला असावा. त्यामुळेच त्यांना ताप आला आणि हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. या प्रतिक्रियेवर राजकारण झालं नसतं तरच नवल. काँग्रेस खालच्या पातळीवरचं राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला होता.

VIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात!

First published:

Tags: Amit shahs, BJP, अमित शहा, ममता बॅनर्जी