अटलबिहारी वाजपेयींच्या घरात आता राहणार अमित शहा?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निवासस्थान दिलं जाऊ शकतं, अशी माहिती आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचं नवी दिल्लीतलं कृष्ण मेनन मार्गावरचं निवासस्थान अमित शहा यांना मिळू शकतं.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 08:59 PM IST

अटलबिहारी वाजपेयींच्या घरात आता राहणार अमित शहा?

नवी दिल्ली, 6 जून : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निवासस्थान दिलं जाऊ शकतं, अशी माहिती आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नवी दिल्लीतलं कृष्ण मेनन मार्गावरचं निवासस्थान अमित शहा यांना मिळू शकतं.

14 वर्षं वाजपेयींचं वास्तव्य

2004 मध्ये भाजपच्या सरकारचा पराभव झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी या निवासस्थानी राहायला गेले. इथे ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत 14 वर्षं राहिले. वाजपेयींच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यात हे घर सोडलं.

वाजपेयींचं हे अधिकृत निवासस्थान आता केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दिलं जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. अमित शहा यांनी नुकतीच या घराला भेट दिली आणि या घरामध्ये काही बदल करायला सांगितले. या घराची दुरुस्ती आणि सुशोभिकरण यासाठी एकदोन महिने लागतील,अशीही माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला जोरदार यश मिळाल्यानंतर अमित शहा यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. सध्या अमित शहा हे 11 अकबर रोड या निवासस्थानी राहत आहेत.

Loading...

दिग्गज नेत्यांच्या घरांची स्मारकं नाही

एखाद्या दिग्गज नेत्याचं निधन झाल्यानंतर त्याचं घर हे स्मारकात रुपांतरित करण्यात येणार नाही, असा निर्णय 2014 मध्येच मोदी सरकारने घेतला होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सरकारनेच 'सदाशिव अटल' या नावाने स्मारक बांधलं आहे. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांचं निवासस्थान राहण्यासाठी वापरात येणार आहे.

महत्त्वाचा लँडमार्क

कृष्ण मेनन मार्गावरचं अटलबिहारी वाजपेयींचं निवासस्थान आता अमित शहा यांच्या वास्तव्यामुळे दिल्लीतला महत्त्वाचा लँडमार्क बनण्याची शक्यता आहे. भाजपचं अध्यक्षपद भूषवलेले अमित शहा यांनी आता केंद्रीय गृहमंत्रिपदाच्या कामाला जोमाने सुरुवात केली आहे.

===========================================================================================

SPECIAL REPORT : शरद पवारांवर संघाची मोहिनी, कार्यकर्त्यांना दिला सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 08:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...