काँग्रेसच्या जातीयवादी प्रचारामुळेच भाजप 150 पर्यंत पोहोचू शकली नाही- अमित शहा

गुजरातमध्ये आम्ही 150 जागांचा दावा केला होता, पण काँग्रेसने खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केल्यामुळेच आमच्या जागा गेल्यावेळी पेक्षा कमी निवडून आल्यात, अशी सारवासारव अमित शहांनी केलीय. गुजरातमध्ये भाजपला सलग पाचव्यांदा सत्ता दिल्याबद्दल अमित शहांनी भाजपने गुजराती जनतेचे आभार मानले.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2017 05:51 PM IST

काँग्रेसच्या जातीयवादी प्रचारामुळेच भाजप 150 पर्यंत पोहोचू शकली नाही- अमित शहा

18 डिसेंबर, नवी दिल्ली : गुजरातमध्ये आम्ही 150 जागांचा दावा केला होता, पण काँग्रेसने खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केल्यामुळेच आमच्या जागा गेल्यावेळी पेक्षा कमी निवडून आल्यात, अशी सारवासारव अमित शहांनी केलीय. गुजरातमध्ये भाजपला सलग पाचव्यांदा सत्ता दिल्याबद्दल अमित शहांनी भाजपने गुजराती जनतेचे आभार मानले. यावेळी आम्हाला जागा कमी मिळाल्या असल्यातरी आमची मतांची टक्केवारी वाढलेली आहे. किंबहुना भाजपला काँग्रेसपेक्षा 8 टक्के जास्त मतं मिळालीत. त्यामुळे ही काही काँटें की टक्कर होती, असं म्हणता येणार नाही, असंही अमित शहांनी म्हटलंय.

गुजरात आणि हिमाचलमधील विजय हा काँग्रेसच्या वंशवाद, जातीयवादाच्या राजकारणाला सडेतोड प्रत्युत्तर असल्याचं अमित शहा म्हणाले. तसंच गुजरातमधील भाजपचा विजय हा विकासाच विजय असल्याचंही ते म्हणाले.

देशभरात भाजपने मोदींच्या नेतृत्वात आतापर्यंत 19 राज्यांमध्ये सत्ता मिळाली असून 14 राज्यांमध्ये भाजप स्वबळावर सत्तेत आल्याचंही अमित शहांनी नमूद केलं. 2019सालीही भाजप मोदींच्यातच नेतृत्वात देशात पुन्हा विकासाच्या मुद्यावरच लोकसभा जिंकेल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2017 05:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...