पाकिस्तानातील मुस्लिमांना आपण नागरिकत्व का द्यायचं? अमित शहा राज्यसभेत आक्रमक

पाकिस्तानातील मुस्लिमांना आपण नागरिकत्व का द्यायचं? अमित शहा राज्यसभेत आक्रमक

विधेयकाबाबत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 डिसेंबर : नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यभेत मांडण्यात आलं आहे. या विधेयकाबाबत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'विधेयकावरून कोणी भीती घालत असेल तर सावध रहा. शेजारी देशात अल्पसंख्याक कमी होत आहे. पाकिस्तान आणि इतर देशातूंन येणाऱ्या मुस्लिमांना नागरिकत्व का द्यावं,' अशी भूमिका अमित शहा यांनी मांडली आहे.

राज्यसभेत अमित शहा आक्रमक

-31 डिंसेंबर 2014 आधी आलेल्यांना नागरिकता मिळणार

-हे विधेयक मुस्लिम विरोधी नाही

-आमच्या जाहीरनाम्याला जनादेश मिळाला

-काही देशांमध्ये अल्पसंख्यांकांवर अत्याचार

-काही देशांमध्ये अल्पसंख्यांकांची संख्या कमी झाली

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर बुधवारी राज्यसभेत मांडले जात आहे. या विधेयकावर राज्यसभेत 6 तास चर्चा होणार आहे. लोकसभेत या विधेयकाच्या बाजुने 311 मतं मिळाली होती. लोकसभेत विधेयक मंजूर झालं असलं तरी राज्यसभेत मोदी सरकारची खरी परीक्षा असणार आहे. लोकसभेत बहुमत असल्यानं हे सहज झालं असलं तरी राज्यसभेत मात्र सरकारकडे बहुमत नाही. भाजपला आशा आहे की तीन तलाक, आर्टीकल 370 हटवण्याबाबतच्या विधेयकांना राज्यसभेची मंजुरी मिळवण्यात यश आलं होतं. त्याच पद्धतीने आताही येईल. विधेयकाबबत शिवसेनेनं लोकसभेत घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसचे वरिष्ठ नाराज असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राज्यसभेत आता आपल्या निर्णयापासून शिवसेना यूटर्न घेणार की आपल्या मतावर ठाम राहणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्यसभेत भाजपचे 83 खासदार आहेत. तर जनता दलाचे 6 खासदार आहेत. बिहारमध्ये नितिश कुमारांची सत्ता आहे. त्यांच्या पक्षाने या विधेयकाला लोकसभेत समर्थन दिलं आहे. त्याशिवाय शिरोमणी अकाली दलाचे तीन, आरपीआय एक आणि इतर पक्षांचे 13 खासदार आहेत. या सर्वांचे मिळून एनडीएकडे 106 इतके संख्याबळ आहे. जदयुने जरी लोकसभेत समर्थन दिलं असलं तरी याबाबत पक्षात मतभेद आहेत.

असं असलं तरीही राज्यसभेमध्ये या विधेयकाला कडाडून विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यसभेत हे विधेयक मंजूर होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2019 12:36 PM IST

ताज्या बातम्या