'साऱ्या देशाला तुमचा अभिमान', अमित शहांनी घेतली अर्शद खान यांच्या कुटुंबीयांची भेट

'साऱ्या देशाला तुमचा अभिमान', अमित शहांनी घेतली अर्शद खान यांच्या कुटुंबीयांची भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. अमित शहांनी अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले अर्शद खान यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अर्शद खान यांच्याबद्दल पूर्ण देशाला अभिमान आहे, असं अमित शहांनी त्यांच्या कुटुंबीयांना सांगितलं.

  • Share this:

श्रीनगर, 27 जून : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. अमित शहांनी अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले अर्शद खान यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अर्शद खान यांच्याबद्दल पूर्ण देशाला अभिमान आहे, असं अमित शहांनी त्यांच्या कुटुंबीयांना सांगितलं. दक्षिण काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये 12 जूनला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अर्शद खान हे सुरक्षा अधिकारी जखमी झाले होते.

अतिरेकी हल्ल्यात मृत्यू

त्यांना दिल्लीतल्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं पण उपचारादरम्यान 16 जूनला अर्शद खान यांचा मृत्यू ओढवला. याच दहशतवादी हल्ल्यात 6 सुरक्षा कर्मचारी शहीद झाले.

अर्शद खान यांना पहिल्यांदा श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे एअर अँब्युलन्सने त्यांना दिल्लीला एम्समध्ये आणण्यात आलं. पण तरीही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. अर्शद खान यांच्या छातीत गोळी लागली होती.

प्राणांची पर्वा न करता लढले

काश्मीरमध्ये 12 जून ला मोटरसायकलवर आलेल्या अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या गस्तीपथकांवर हल्ला चढवला. यामध्ये सीआरपीएफचे 5 जवान शहीद झाले. यामध्ये अर्शद खान यांनाही गोळी लागली.याचवेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एका अतिरेक्यालाही ठार केलं.

'आम्ही तुम्हाला घरं दिलीत, अन्न दिलं आणि तुम्ही मोदींना मतं देता?'

अतिरेक्यांची गोळी लागल्यानंतरही एसएचओ अर्शद खान मोठ्या धीराने लढत राहिले.

आपल्या प्राणांचीही पर्वा न करता त्यांनी अतिरेक्यांना प्रतिकार केला. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.शहीद अर्शद खान यांच्या चार वर्षाच्या मुलाने तिरंग्यामध्ये लपेटलेल्या आपल्या वडिलांना अखेरची सलामी दिली होती.

श्रीनगरचे अर्शद खान 2002 मध्ये पोलीस सेवेत दाखल झाले. त्यांना सब इन्स्पेक्टर पदावर काम करत करिअरची सुरुवात केली होती. ते शहीद झाले तेव्हा ते अनंतनागमध्ये स्टेशन हाऊस ऑफिसरची जबाबदारी सांभाळत होते.

==================================================================================================

VIDEO : मराठा आरक्षणावरील कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांचं UNCUT भाषण

First published: June 27, 2019, 7:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading