'या' मंत्र्याचं नव्या यादीत नाव नसल्याने अमित शहांबद्दलचा सस्पेन्स आणखीच वाढला

नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत इतरही काही खासदार मंत्रिपदाची शपथ घेतील.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 03:49 PM IST

'या' मंत्र्याचं नव्या यादीत नाव नसल्याने अमित शहांबद्दलचा सस्पेन्स आणखीच वाढला

नवी दिल्ली, 30 मे : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत इतरही काही खासदार मंत्रिपदाची शपथ घेतील.

सरकारमधील संभाव्य मंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन करण्यात आल्याची माहिती आहे. या मंत्र्यांची यादी News18 च्या हाती मिळाली आहे. पण या यादीत मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये मंत्री राहिलेल्या जेपी नड्डा यांचं नाव आलेलं नाही. त्यामुळे अमित शहांच्या जागी जेपी नड्डा हे भाजपचे अध्यक्ष होतील, या चर्चेला आणखीच बळ मिळालं आहे.

भाजपचे विद्यमान अध्यक्ष यांनी पक्षाला लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवून देत आपलं संघटन कौशल्य दाखवून दिलं आहे. पण आता सरकारमध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येईल, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीर त्यांच्याकडे नक्की कोणती मंत्रिपद दिलं जात, हे पाहणं औत्सुक्याचा ठरणार आहे.

भाजपकडून कुणाला-कुणाला मिळणार संधी?

सदानंद गौडा, अर्जुन राम मेघवाल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले , सुरेश अंगाडी, पीयूष गोयल, बाबूल सुप्रियो, जितेंद्र सिंह, किशन रेड्डी, सुरेश अंगदी, स्मृती इराणी, प्रहलाद जोशी, राजनाथ सिंह, निर्मला सीतारमण, रविशंकर प्रसाद, मुख्तार अब्बास नकवी यांना पंतप्रधान कार्यालयामधून फोन आल्याची माहिती आहे.

Loading...


VIDEO : कडक उन्हामुळे होतंय अंड्याचं ऑम्लेट


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 03:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...