अमित शहा महाराष्ट्रातील कार्यक्रम अर्ध्यावरच सोडून गेले, कारण...

अमित शहा महाराष्ट्रातील कार्यक्रम अर्ध्यावरच सोडून गेले, कारण...

अमित शहा हे नांदेड इथल्या गुरुद्वाराला भेट देणार होते. परंतु सकाळी ते अचानक दिल्लीला निघून गेले. त्यानंतर शहा महाराष्ट्र दौरा अर्ध्यावरच सोडून का गेले, याविषयी मोठी चर्चाही रंगली.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 जानेवारी : राज्यसभेत तिहेरी तलाकच्या मुद्यावर भाजपनं व्हीप बजावला आहे. भाजपचे अध्यक्ष असलेले अमित शाह हे राज्यसभेचे खासदारही आहेत. याशिवायच 11 आणि 12 जानेवारीला दिल्लीत भाजपची राष्ट्रीय परिषद आहे. त्याच्या काही बैठका असल्यानं देखील शाह हे तातडीनं महाराष्ट्रातून दिल्लीला गेल्याची माहिती आहे.

अमित शहा हे नांदेड इथल्या गुरुद्वाराला भेट देणार होते. परंतु सकाळी ते अचानक दिल्लीला निघून गेले. त्यानंतर शहा महाराष्ट्र दौरा अर्ध्यावरच सोडून का गेले, याविषयी मोठी चर्चाही रंगली. पण भाजपने राज्यसभेत तिहेरी तलाकवर व्हीप बजावला असल्याने अमित शहा दिल्लीला परतले, अशी माहिती आहे.

अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा आणि वाद

रविवारी लातूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात अमित शहा यांनी आक्रमक भाषण करत मित्रपक्ष शिवसेनेवर निशाणा साधला. त्यानंतर शिवसेनेनंही भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

काय म्हणाले होते अमित शहा?

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात युती झाली तर ठिक, नाहीतर विरोधियोंको 'पटक' देंगे असा इशारा त्यांनी दिलाय. शहांचा हा इशारा नेमका कुणाला आहे यावर आता चर्चा सुरू झालीय. कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथ कसं जिंकता येईल ते बघावं असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांनी केलं. लातूर इथं पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांचीही फटकेबाजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही युती बाबात एक मोठं विधान केलंय. राज्यात युतीचा निर्णय हा भाजपचे अध्यक्ष अमित शहाच घेतील असं ते म्हणाले. "महाराष्ट्रात युती होणार की नाही याची काळजी कार्यकर्त्यांनी करू नये तर त्यांनी कामाला लागावं. राज्यातल्या 48 पैकी 40 जागा जिंकण्याची तयारी ठेवावी." असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

सामनातून शिवसेनेचं उत्तर

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका करणारे शाब्दिक ठाकरी बाण सोडले आहेत. मोदी सरकारने केलेल्या रोजगार निर्मितीचा दावा सीएमआयई या संस्थेच्या अहवालाने कसा खोटा ठरवला, त्याची आकडेवारीसह माहिती सामना अग्रलेखातून जाहीर करण्यात आली आहे.

ज्या हातांनी मोठ्या अपेक्षेने मोदी सरकारला निवडून दिलं. त्यांना मोदी सरकारची जुमलेबाजी आता लक्षात आली असून रोजगार निर्मितीचा ढोल फुटल्यामुळे आता देशातील बेरोजगारांचे हात मोदी सरकारचे तख्त फोडण्यासाठी शिवशिवत असल्याचं सामना अग्रलेखातून म्हटलं आहे.

मनसे महाआघाडीत येणार? काय म्हणत आहेत राजकीय विश्लेषक? पाहा VIDEO

First published: January 7, 2019, 12:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading