अमित शहा उद्या जाणार काश्मीर दौऱ्यावर, अमरनाथ यात्रेसाठीही कडक सुरक्षाव्यवस्था

अमित शहा उद्या जाणार काश्मीर दौऱ्यावर, अमरनाथ यात्रेसाठीही कडक सुरक्षाव्यवस्था

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या काश्मीरच्या दौऱ्यावर जात आहेत. गृहमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अमित शहांचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठीही सुरक्षेचे कडक उपाय योजण्यात आले आहेत.

  • Share this:

श्रीनगर, 25 जून : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या काश्मीरच्या दौऱ्यावर जात आहेत. गृहमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अमित शहांचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षेचे कडक उपाय योजण्यात आले आहेत.

1 जुलैपासून अमरनाथ यात्रा

अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून सुरू होते आहे. यासाठी लष्कर आणि काश्मीर पोलीसांसह निमलष्करी दलाचे 42 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. अमरनाथ यात्रा सुमारे दीड महिना चालणार आहे.

या यात्रेच्या वाटेवर दहशतवादी स्फोट घडवून आणण्याचा धोका असतो. आईडी स्फोट आणि जवाहर बोगद्याच्या परिसरात होणारे हल्ले यांचा धोका ओळखून याठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

MTDCचा बेजबाबदारपणा, सडत आहेत 3 कोटींच्या बोटी

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यातही आयईडी स्फोट घडवण्यात आला होता. पुलवामामध्येच झालेल्या आणखीही हल्ल्यात आयईडीचा वापर झाला होता.

यात्रेकरूंची सुरक्षा महत्त्वाची

अमरनाथ यात्रेमध्ये ग्रेनेड हल्ले, यात्रेकरूंचं अपहरण, सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ले अशा घटना होऊ नयेत म्हणून सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहेत. या यात्रेच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा हेलिकॉप्टरमधून हवाई सर्वेक्षणही करणार आहेत.

याआधी अमरनाथ यात्रेवर झालेले हल्ले पाहता यावेळी अशी धोक्याची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. 2017 मध्ये अतिरेक्यांनी यात्रेकरूंच्या एका बसवर हल्ला केला होता. त्यात 12 जणांचा मृत्यू ओढवला. 2018 मध्ये अतिरेक्यांनी एक स्फोट घडवून आणला. यात एक यात्रेकरू जखमी झाला होता.

ही अमरनाथ यात्रा निर्धोक व्हावी यासाठी सुरक्षा यंत्रणा प्रयत्नशील आहेत. त्यातही केंद्रीय गृहमंत्र्यांचा हा पहिलाच दौरा असल्यामुळेही काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षेचा बंदोबस्त आहे.

==============================================================================================

VIDEO : नाशिकच्या मुथ्थुट फायनान्समध्ये समुअल्सवर गोळीबार करणारा व्हिडिओ समोर

First published: June 25, 2019, 6:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading