Elec-widget

मी 42 निवडणुका जिंकल्या आहेत, प्रियांका गांधींचा सलग 12 वर्षं पराभव झाला - अमित शहा

मी 42 निवडणुका जिंकल्या आहेत, प्रियांका गांधींचा सलग 12 वर्षं पराभव झाला - अमित शहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आपल्याला पूर्ण विश्वास आहे, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. न्यूज 18 च्या 'अजेंडा इंडिया' कार्यक्रमात अमित शहा यांची खास मुलाखत घेण्यात आली. त्यात त्यांनी या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतं मांडली.

  • Share this:

नवी दिल्ली, १ एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आपल्याला पूर्ण विश्वास आहे, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. न्यूज 18 च्या 'अजेंडा इंडिया' कार्यक्रमात अमित शहा यांची खास मुलाखत घेण्यात आली.  त्यात त्यांनी या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतं मांडली.

1. पक्षनेतृत्व : आमच्या पक्षात केवळ क्रमांक 1 चा नेता आहे आणि ते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांच्यानंतर कोण, असं तुम्ही विचाराल तर कुणाचंही नाव तुमच्या डोळ्यासमोर येणार नाही.

2. प्रियांका गांधी वाड्रा : प्रियांका गांधींचं लिपस्टिक लावणं, त्यांचं पाणी पिणं हे सगळं मीडिया कव्हर करतं. पण आमच्यासाठी ही काही मोठी गोष्ट नाही. प्रियांका गांधी 12 वर्षं राजकारणात आहेत. हे त्यांचं 13 वं वर्षं आहे. त्यांचा सलग 12 वर्षं पराभव झाला आहे. मी आतापर्यंत 42 निवडणुका लढवल्या आणि सगळ्या जिंकल्या आहेत.

3. न्याय योजना : नेहरूंपासून इंदिरा गांधींपर्यंत आणि सोनियांपासून राहुल गांधींपर्यंत सगळ्यांनीच अशा अनेक घोषणा केल्या आहेत. पण पाच पिढ्यांनंतरही आपण आजही गरिब आहोत. घोषणा काही कामाच्या नाहीत. त्या अमलात आणण्यासाठी इच्छाशक्ती हवी.

4. राहुल गांधींची वायनाडमधली उमेदवारी  : राहुल गांधींना अमेठीमधून लढणं कठीण जात आहे. स्मृती इराणी राहुल गांधींपेक्षा जास्त वेळा अमेठीला गेल्या आहेत.

Loading...

5. राम मंदिर : आम्ही राम मंदिर बांधण्याच्या वचनापासून दूर गेलेलो नाही. आम्ही मंदिर बांधण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्हाला ही वादग्रस्त भूमी आहे, असं वाटत नाही.

6. काश्मीर  :  आम्ही काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यासाठी कटिबद्ध आहोत. राज्यसभेमध्ये आम्हाला बहुमत नसल्यामुळे यात अडचणी येत आहेत. 2020 मध्ये हे चित्र बदलेल, अशी आशा आहे.

7. निवडणूक निकाल : या निवडणुकीत भाजप आणि एनडीए या दोघांच्याही जागा वाढतील. उत्तर प्रदेशात आमच्या जागा कमी होणार नाहीत. बंगाल आणि ईशान्य भारतातही आम्हाला चांगल्या जागा मिळतील.

==========================================================================================================================================================

VIDEO: आपल्या वाढदिवसानिमित्त आठवलेंनी मोदींवर केली 'ही' कविता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 08:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...