Pulwama Attack : देशभर संतापाची लाट; त्यात राम मंदिराबद्दल बोलल्यामुळे अमित शहा झाले ट्रोल

Pulwama Attack : देशभर संतापाची लाट; त्यात राम मंदिराबद्दल बोलल्यामुळे अमित शहा झाले ट्रोल

एका बाजूला पुलवामा हल्ल्याच्या निषेधाचे सूर सोशल मीडियावर उमटत असताना अमित शहांनी राम मंदिराचे सूर आळवले आणि भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ते ट्वीटही केलं गेलं. यावरून ट्विटरकरांनी भाजप आणि अमित शहा यांना ट्रोल केलं.

  • Share this:

मुंबई, 14 फेब्रुवारी : काश्मीरमध्ये पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात 27  जवान शहीद झाल्याचं वृत्त येताच साऱ्या देशभर संतापाची लाट उसळली. सोशल मीडियामधून नागरिकांनी या हल्ल्याचा निषेध केला. दहशतवादी संघटना जैश ए महम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. एका बाजूला या सगळ्या बातम्या येत असतानाच भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून मात्र अमित शहांच्या भाषणातलं राम मंदिराच्या बाबतीतलं वक्तव्य ट्वीट केलं गेलं. यावरून ट्विटरकरांनी भाजप आणि अमित शहा यांना ट्रोल केलं.

भाजपचं हेच ते वादग्रस्त ट्वीट

एकीकडे देशभरातले नागरिक पुलावामा हल्ल्याच्या निषेधाचे सूर लावत असतानाच अमित शहांनी त्यांच्या भाषणात राम मंदिर उभारणीचा सूर लावल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्याविषयी भाजपच्या ट्विटर अकाउंटवरून लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केलं गेलं आणि अमित शहांच्या राम मंदिराच्या मुद्द्याला मोठं केलं गेलं. "इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना मी हमी देतो की, अयोध्येत राम मंदिर उभारलं जाणारच", अमित शहांचं हे वक्तव्य भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट केलं गेलं.  त्यावर व्यक्त झालेल्या या काही प्रतिक्रिया -

देशात माणसं जिवंत राहिली तर राम मंदिर बांधणार ना... इथपासून ते देशावर हल्ला करणाऱ्या आणि जवानांच्या बलिदानाच्या दिवशी राजकारण करणाऱ्यांचा निषेध इथपर्यंत प्रतिक्रिया या ट्वीटवर व्यक्त झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संध्याकाळी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली आणि या शहीद कुटुंबीयांच्या पाठिशी देश उभा असल्याचं सांगितलं. भाजपच्या ट्विटर अकाउंटवरून पंतप्रधानांचं हे ट्वीट नंतर रीट्वीट करण्यात आलं. अमित शहांनीही या हल्ल्याचा निषेध केल्याचं ट्वीट केलं. पण अमित शहांच्या भाषणावरून सोशल मीडियावर अवेळी, अस्थानी उपस्थित केलेला मुद्दा असं म्हणत भाजप आणि अमित शहांची अनेकांनी निंदा केली.

राम मंदिर तर उभारलं जाईलच कधी तरी, पण आत्ता आम्हाला बदला पाहिजे, असं एकानं लिहिलं. सर्जिकल स्ट्राइक हवेत, अशा अर्थाचे ट्वीटही करण्यात आले. तिकडे जवानांवर हल्ला होत असताना तुम्ही राम मंदिराचा राग आळवता, एवढी संवेदनशीलता नसेल तर कोण या देशात सुरक्षित राहणार, असा सवाल एका नेटकराने केला आहे.

First Published: Feb 14, 2019 07:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading