S M L

महाराष्ट्रातून जाणार 2019 च्या सत्तेचा मार्ग, ही आहे अमित शहांची 'खास योजना'

'मराठे पानपतचं युद्ध हरले, आणि देश 200 वर्ष गुलमीत गेला.'

News18 Lokmat | Updated On: Jan 11, 2019 05:40 PM IST

महाराष्ट्रातून जाणार 2019 च्या सत्तेचा मार्ग, ही आहे अमित शहांची 'खास योजना'

नवी दिल्ली 11 जानेवारी : लोकसभा निवडणुका चार महिन्यांवर आल्या असताना  राजधानी नवी दिल्लीत भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन शुक्रवारपासून सुरू झालं. देशभरातून अधिवेशनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मराठ्यांचा इतिहास सांगितला. पानिपतच्या युद्धात मराठे हरल्यामुळे देश 200 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत गेला. 2019चं युद्धही असंच महत्त्वाचं आहे असं सांगत अमित शहांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

अमित शहा म्हणाले, ''130 युद्ध जिंकणारी मराठा सेना पानिपतचं एक निर्णायक युद्ध हरली आणि त्यानंतर भारत 200 वर्षांच्या गुलामीत गेला. शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात केली. संभाजी महाराज, ताराबाई, पेशव्यांपर्यंत राज्यविस्तार झाला. पण एक लढाई हरली आणि गुलामगिरी आली. पेशव्यांनी 131 युद्ध जिंकली.पण पानिपतचं एक युद्ध हरलं आणि देश गुलामीत गेला. आत कुठल्याही परिस्थितीत 2019 ची लढाई जिंकायची आहे." उद्घाटनाच्या भाषणात अमित शहांनी मराठ्यांच्या इतिहासाचं स्मरण करणं याला खास महत्त्व आहे. उत्तर प्रदश नंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या  सर्वात जास्त 48 जागा आहेत.


त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याची भाजपची योजना आहे. त्यामुळे थोडं नमतं घ्यावं लागलं तरी चालेल मात्र शिवसेनेसोबत युती करण्याची भाजपची योजना आहे. आणि आता दोघांमध्ये जागावाटपाची चर्चाही सुरू झाल्याचं पुढे आलंय.

Loading...


त्यामुळेच भाषणात अमित शहांनी मराठी इतिसाहाचं स्मरण केलं. शिवाजी महाराजांचा गौरव केला आणि सदाशीवराव पेशव्यांचही स्मरण केलं. पानिपतात हरल्याची जखम अजुनही मराठी माणसांमध्ये भळभळत असते. त्याचा आधार घेत शहांनी 2019 च्या निवडणुकीची तुलना पानिपतच्या लढाईशी करून निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाला इतिहासाची आठवण करू दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2019 05:40 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close