SPECIAL REPORT: भाजपाध्यक्षपदाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम, यांच्याकडे राहणार धुरा

SPECIAL REPORT: भाजपाध्यक्षपदाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम, यांच्याकडे राहणार धुरा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण या चर्चांना तूर्तास पूर्णविराम

  • Share this:

मुंबई, 14 जून: अमित शहा केंद्रात गृहमंत्री झाल्यानं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली होती. त्याला तूर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे. पुढचे 6 महिने तरी अमित शहा यांच्याकडेच भाजपाध्यक्षपदाची धुरा असेल, अशी शक्यता आहे.

भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शहा मोदी-2 सरकारमध्ये नंबर दोनचे मंत्री झाले. भाजपचा अध्यक्ष म्हणून अमित शहा यांची जागा कोण घेणार याची चर्चा देशभरात सुरू झाली.

एकाचवेळी गृहमंत्रिपदासारखं अतिमहत्त्वाचं खातं आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाचा व्याप सांभाळणं तसं कठीणच. त्यामुळे अमित शहांच्या जागी जे पी नड्डा यांचं नाव चर्चेत होतं त्याला पूर्ण विराम मिळाला आहे. गुरुवारच्या भाजपच्या बैठकीत त्याचा निर्णय होईल अशी अपेक्षा होती पण पुढचे सहा महिने अमित शहाच अध्यक्षपदी कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

SPECIAL REPORT : मंत्रिपद सोडून चंद्रकांतदादा प्रदेशाध्यक्षपद स्वीकारणार का?

याचाच अर्थ महाराष्ट्राची निवडणूक अमित शाह यांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 2014 पासून नरेंद्र मोदी आणि अमित शाहा या जोडीनं भाजपला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलंय. त्यामुळे अमित शाहा यांच्या तोडीस तोड अध्यक्ष शोधणं हेसुद्धा भाजपसाठी एक मोठं आव्हान असणार आहे.

First published: June 14, 2019, 9:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading