कलम 371ला धक्का लावणार नाही- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

कलम 371ला धक्का लावणार नाही- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

ईशान्येतील राज्यांसाठीचा घटनेने दिलेला विशेष अधिकार(Special Status) कलम 371 (Article-371)ला कोणत्याही परिस्थितीत हात लावला जाणार नाही, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)यांनी दिले.

  • Share this:

गुवाहाटी, 08 सप्टेंबर: ईशान्येतील राज्यांसाठीचा घटनेने दिलेला विशेष अधिकार(Special Status) कलम 371 (Article-371)ला कोणत्याही परिस्थितीत हात लावला जाणार नाही, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)यांनी दिले. गुवहाटी येथे ईशान्य राज्यासाठी आयोजित 68व्या परिषदेत ते बोलत होते. कलम 370 ही तात्पुरती तरतूद होती. तर कलम 371 मधील विशेष तरतूदी या वेगळ्या आहेत. या दोन्ही गोष्टींमध्ये बरेच अंतर आहे, असे शहा म्हणाले.

जम्मू-काश्मीरसाठीचे कलम 370मधील अधिकतर तरतूदी हटवल्यानंतर ईशान्येकडील नागरिकांना खोटी आणि भटकावणारी माहिती देण्याचा प्रयत्न केला गेला. पण केंद्र सरकार कधीही 371 कलम हटवणार नाही. यासंदर्भात मी संसदेत देखील स्पष्ट केल्याचे शहा यांनी सांगितले.आज ईशान्येकडील आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमोर मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, केंद्र सरकार कलम 371 टच देखील करणार नाही.

काय आहे कलम 371?

भारतीय राज्यघटनेतील कलम 371मध्ये अनेक राज्यांसाठी विशेष तरतूदी केल्या आहेत. यातील अधिकतर तरतूदी ईशान्येकडील राज्यांसाठी आहेत. या कलमामध्ये जनजातीय संस्कृती (Tribal Culture) संरक्षण देण्यात आले आहे. याच आधारावर ईशान्येकडील राज्यांना विशेष दर्जा मिळाला आहे. राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (NRC)अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांचा हा पहिला आसाम दौरा आहे.

VIDEO: मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकावर थांबलीच नाही, प्रवासी संतापले!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Amit Shah
First Published: Sep 8, 2019 06:14 PM IST

ताज्या बातम्या