'50 वर्षे सत्तेत राहण्याचं स्वप्न पाहा', अमित शाहांचा कार्यकर्त्यांना सल्ला

'50 वर्षे सत्तेत राहण्याचं स्वप्न पाहा', अमित शाहांचा कार्यकर्त्यांना सल्ला

आगामी 50 वर्षांत सत्तेत राहण्याचं स्वप्न पाहा, असं आवाहन अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

  • Share this:

23 एप्रिल : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी गाझियाबाद येथील सभेत कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. आगामी 50 वर्षांत सत्तेत राहण्याचं स्वप्न पाहा, असं आवाहन अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

'निवडणुकीतील विजयाची कल्पना ही केवळ पाच वर्षे, दहा वर्षे, 15 वर्षे करु नका, तर 50 वर्षे सत्तेत राहण्याचा संकल्प करा. ज्याप्रमाणे काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रदीर्घकाळ ग्रामपंचायत ते संसदेचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन राज्य केलं. त्याप्रमाणे 50 वर्ष सत्तेत राहण्यासाठी काम केलं पाहिजे,' असं अमित शाह कार्यकर्त्यांना म्हणाले आहे.

अमित शहा पुढे म्हणाले, 'केवळ निवडणुकीपर्यंतचा विचार करून काही होणार नाही. विकासकामांत अखेरपर्यंत जीव ओतून काम करायला हवं. 4 वर्षात मोदी सरकारनं एकही असं काम केलं नाही ज्याने भाजप नेत्यांच्या अपमान सहन करावा लागेल. सरकारच्या कामामुळे नेहमीच सगळे ताठ मानेने चालतात.'

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2018 07:33 AM IST

ताज्या बातम्या