मुंबईचा दौरा आटोपून अमित शहा दिल्लीला परतले

मुंबईचा दौरा आटोपून अमित शहा दिल्लीला परतले

या दौऱ्यावर अमित शहांनी संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशींची भेट घेतली. दरम्यान या बैठकीचा तपशील कुणालाही देण्यात आलेला नाही.

  • Share this:

मुंबई,26 सप्टेंबर: एका दिवसाचा मुंबईचा दौरा आटपून अमित शहा दिल्लीला परतले आहे. यावेळी मुंबईला अमित शहा आणि नारायण राणे एकाच विमानानी आले होते.

या दौऱ्यावर अमित शहांनी संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशींची भेट घेतली. दरम्यान या बैठकीचा तपशील कुणालाही देण्यात आलेला नाही.आगामी निवडणुकीच्या तयारीची चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. तसंच सौभाग्य योजनेच्या अंमलबजावणीचीही त्यांनी चर्चा केली. दोन दिवस भाजपच्या कार्यकारिणीची मोठी बैठक पार पडली होती

आपण 2019च्या निवडणुकीला लागलो असल्याचं अमित शहांनी सांगितलं आणि त्यासाठी प्रचार करण्याची सुचना त्यांनी भाजप खासदारांना दिली होती.त्यानंतर नारायण राणेंची भेट घेऊल मुंबईसाठी ते रवाना झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2017 11:31 AM IST

ताज्या बातम्या