मराठी बातम्या /बातम्या /देश /

'पानिपत'चा उल्लेख करून 2019 ची लढाई जिंकण्याची ही आहे भाजपची योजना!

'पानिपत'चा उल्लेख करून 2019 ची लढाई जिंकण्याची ही आहे भाजपची योजना!

New Delhi: Prime Minister Narendra Modi with BJP National President Amit Shah on the second day of the two-day BJP National Convention, at Ramlila Ground in New Delhi, Saturday, Jan 12, 2019. (PTI Photo/Kamal Kishore)  (PTI1_12_2019_000173B)

New Delhi: Prime Minister Narendra Modi with BJP National President Amit Shah on the second day of the two-day BJP National Convention, at Ramlila Ground in New Delhi, Saturday, Jan 12, 2019. (PTI Photo/Kamal Kishore) (PTI1_12_2019_000173B)

'पानिपत ही मराठ्यांच्या इतिहासातली भळभळणारी जखम आहे. त्या युद्धात मराठ्यांचा पराभव जरी झाला असला तरी ती त्यांच्या शौर्याचीही गाथा आहे.'

मुंबई 21 जानेवारी : दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात सर्वात जास्त मुद्दा गाजला तो भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी उपस्थित केलेल्या 'पानिपता'च्या युद्धाचा. राजकारणी जेव्हा असा कुठला उल्लेख करतात तेव्हा त्याच्या मागे त्यांचे सुप्त हेतू असतात. शिवसेनेचे नेते कायम आपल्या भाषणात शिवाजी महाराज, अफझल खान, मुघल साम्राज्य, खंजीर, विश्वासघात असे उल्लेख करून मराठी आणि हिंदू अस्मिता चेतवण्याचा प्रयत्न करत असतात. तोच प्रयत्न पानिपताच्या लढाईचा उल्लेख करून अमित शहांनी केला आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपाच्या अधिवेशनात शहा म्हणाले होते, "पानिपतच्या लढाईत मराठे हरल्यामुळेच देश 200 वर्ष गुलामीत गेला. तशीच निर्णायक लढाई 2019 मध्ये आपल्याला लढायची आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थित हे युद्ध आपल्याला जिंकायचच आहे." असं सांगत त्यांनी आपण हरलो तर देश पुन्हा मागे जाणार असल्याचं सांगत कार्यकर्त्यांना चेतवण्याचा प्रयत्न केला.

पानिपत ही मराठ्यांच्या इतिहासातली भळभळणारी जखम आहे. त्या युद्धात मराठ्यांचा पराभव जरी झाला असला तरी ती त्यांच्या शौर्याचीही गाथा आहे. त्यामुळे इतिहासाचा आढावा घेताना कायम पानिपतच्या लढाईचा उल्लेख केला जातो. आता निवडणुका तोंडावर आल्याने अशा अस्मितांचा वापर करून कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला नेत्यांकडून केला जातो.

ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांच्या मते, "पानिपताचा उल्लेखामुळं भाजप गोंधळलेला आहे असं दिसतं. विरोधकांच्या एकजुटीमुळे भाजपला पानिपताची आठवण झाली. या लढाईत मराठ्यांचा जरी पराभव झाला असला तरी ती शौर्याचीही लढाई होती." त्यामुळे भाजपला नेमका काय संदेश द्यायचा होता ते त्यांनाही कळत नाही असं मतही भटेवरा यांनी व्यक्त केलं.

गेल्या काही दिवसांमध्ये अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पानिपत, शिवाजी महाराज, जीजामाता यांचा उल्लेख करत मराठा अस्मितेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. मराठ्यांना आरक्षण, ओबीसींसाठी जास्त आर्थिक तरतूद सरकारने केली.  आता महात्मा आणि सावित्रीबाई फुले आणि कांशीराम यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा सरकार करणार असल्याचंही बोललं जातंय.

त्यामुळे मराठा, ओबीसी,दलित अशा सर्व घटकांना खूष करण्याची भाजपची योजना आहे. 2019 हे त्या योजनेचं टार्गेट आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ती मोहिम भाजपला फत्ते करायची आहे.

VIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री

First published:

Tags: Amit Shah, Election 2019, Narendra modi, Panipat war, अमित शहा, नरेंद्र मोदी, पानिपतची लढाई, लोकसभा निवडणुक 2019