पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांना मंत्रिमंडळात देणार मोठी जबाबदारी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांना मंत्रिमंडळात देणार मोठी जबाबदारी?

अमित शहांना नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी संधी मिळणार का? यावर आता तर्क लढवले जात आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मे : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपनं लोकसभेच्या नेतृत्वात मोठा विजय मिळवला. तर NDAला देखील 350 जागा मिळाल्या. पण, या विजयामागे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या चाणक्यनितीची चर्चा सध्या देशात जोरात सुरू आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि मित्र पक्षांची कामगिरी ही सरस ठरली. नाराज मित्र पक्षांची मनधरणी करण्यामध्ये देखील अमित शहा यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

अमित शहा नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात?

2014मध्ये देखील अमित शहा यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठं यश मिळवून दिलं होतं. शिवाय, नरेंद्र मोदी यांना वाराणसीमधून मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी करण्यामागे अमित शहांचा हात राहिला आहे. तसंच नरेंद्र मोदींचा अमित शहांवर असलेला विश्वास सर्वज्ञात आहे. त्यामुळे अमित शहांना मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी देण्यात येईल असं मत राजकीय पंडित व्यक्त करतात. अमित शहा सध्या राज्यसभा खासदार देखील आहेत. शिवाय, लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी गांधीनगरमधून मोठा विजय मिळवला आहे.

अमित शहांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इतका विश्वास का?

नरेंद्र मोदींचे विश्वासू

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू अशी अमित शह यांची ओळख आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमित शहा यांच्याकडे मोठी जबाबदारी देखील होती. तर, नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री ते पंतप्रधान या प्रवासात देखील अमित शहा यांची चाणक्यनिती उपयोगी पडली आहे. सोहराबुद्दीन प्रकरणात अमित शहा यांना न्यायालयानं गुजरातमध्ये प्रवेश बंदी केली होती. त्यावेळी नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार अमित शहा यांनी राज्याबाहेर काम केलं होतं.मुख्य:ता त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या संघटनात्मत बांधणीचं फळ भाजपला 2014मध्ये मिळालं होतं.

मोदींनी नवनिर्वाचित खासदारांना काय दिला सल्ला? या आणि इतर महत्त्वपूर्ण 18 घडामोडी, पाहा VIDEO

First published: May 26, 2019, 9:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading