अमित शहांच्या सगळ्यात जवळच्या नेत्याने केली 'ही' चूक मान्य

अमित शहांच्या सगळ्यात जवळच्या नेत्याने केली 'ही' चूक मान्य

भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सगळ्यात जवळच्या नेत्याने अखेर त्यांची चूक कबुल केली आहे.

  • Share this:

इंदौर, 11 डिसेंबर : भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सगळ्यात जवळच्या नेत्याने अखेर त्यांची चूक कबुल केली आहे. इंदौरमध्ये सुरुवातीला पहिल्या राऊंडच्या मतमोजणीनंतर काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा इंदौरमधून कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आकाश विजयवर्गीय आघाडीवर आहे.

पण असं असतानादेखील तिकिट वाटपावेळी चूक झाल्याचं कैलाश विजयवर्गीय यांनी मान्य केलं आहे. कैलाश विजयवर्गीय हे भाजपचे वरिष्ठ नेता आहे ते अमित शहा यांचे सगळ्यात जवळचे नेते आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपचीच सत्ता स्थापन व्हावी अशी आशा आहे पण तिकीट वाटपात आपली चुक झाल्याची धक्कादायक कुबुली विजयवर्गीय यांनी दिली आहे.

इंदौर विधानसभा क्षेत्र क्रमांक 3मध्ये भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आकाश विजयवर्गीय आघाडीवर आहे. तब्बल 700 मतांनी त्यांनी आघाडी मिळवली आहे. आकाश विजयवर्गीय यांच्या विरोधात मैदानात काँग्रेसचे दिग्गज नेते आश्विन जोशी निवडणूक लढवत आहे. पहिल्या राऊंडनंतर मध्य प्रेदशच्या इंदोर मतदार संघातून काँग्रेसने आघाडी घेतली होती. तेव्हा जोशी हे 1024 मतांनी ते आघाडीवर होते. पण आता 700 मतांनी बाजी मारत आकाश विजयवर्तीय आघाडीवर आले आहेत.

या विधानसभा क्षेत्रात यावेळी 12 टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे आता भाजप गड राखणार की काँग्रेसचा वनवास संपणार हे आता आज स्पष्ट होईल. मागच्या निवडणुकांवेळी भाजपच्या उषा ठाकूर यांनी काँग्रेसच्या उमेदवार अश्विन जोशी यांचा पराभव केला होता.

विधानसभा निवडणुकीत सत्ताबदलाचे संकेत मिळाल्याने भाजपमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यात सर्व देशाचं लक्ष मध्य प्रदेशकडे लागलं आहे. यावळी राज्यात रेकॉर्ड 75.05 टक्के मतदान झालं. आत्तापर्यंतचं हे सर्वाधिक मतदान आहे. त्यामुळे आता जनतेनं कुणाच्या पारड्यात कौल टाकला हे 11 डिसेंबरला उघड होणार आहे.

2008च्या निवडणुकीत भाजपने 143, काँग्रेसने 71, बसपानं 7 आणि इतर अपक्षांनी एकूण 9 जागांवर विजय मिळवला होता. त्याचप्रमाणे 2013मध्ये भाजपनं 165 जागा घेऊन आपलं सरकार बनवलं होतं. यावेळी काँग्रेसला 58, बसपाला 4 आणि इतर पक्षांना 3 जागा मिळाल्या होत्या.

आताच्या निवडणुकीत भाजपचे 230 आणि काँग्रेसचे 229 उमेदवार रिंगणात आहेत. बसपा 227, गोंगपा (गोंडवाना गणतंत्र पार्टी) 73 आणि समाजवादी पक्ष 52 जागांवर निवडणूक लढवत आहे. पहिल्यांदा सपाक्सनं 109 उमेदवार निवडणुकीत उमेदवार उभे केलेत, तर आम आदमी पक्षाचे 207 उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत.

मध्य प्रदेशात सामान्य वर्गासाठी 148, एससीसाठी 35 आणि एसटीसाठी 47 जागा आरक्षित आहेत. इथे 28 नोव्हेंबरला मतदान झालं. राज्यातला विधानसभेचा कार्यकाळ 7 जानेवारी 2019ला संपतोय.

राज्यातल्या 65 हजार 367 मतदान केंद्रांवर 28 नोव्हेंबरला मतदान झालं. राज्यातल्या एकूण मदारांची संख्या 5 कोटी 4 लाख 33 हजार 79  एवढी आहे. त्यातल्या 3 कोटी 78 लाख 52 हजार 213 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात  1 कोटी 99 लाख 86 हजार 978 पुरूष मतदार, तर 1 कोटी 78 लाख 64 हजार 900 महिला मतदारांचा समावेश आहे. राज्यात सर्वात जास्त 83.92 टक्के मतदान छिंदवाडा जिल्ह्यात तर सर्वात कमी 61.49 टक्के मतदान भिण्ड जिल्ह्यात झालं.

VIDEO : जेव्हा पवार आजोबा नातीच्या गाडीतून घरी जातात

First published: December 11, 2018, 12:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading