Home /News /national /

कमांडोची अशी प्रात्यक्षिकं ज्याने उर भरून येईल, VIDEO पाहून थक्क व्हाल

कमांडोची अशी प्रात्यक्षिकं ज्याने उर भरून येईल, VIDEO पाहून थक्क व्हाल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील राजारहाट NSGच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी NSGच्या जवानांनी युद्धाचा सराव केला. जवानांनी सादर केलेली प्रात्यक्षिकं डोळ्यांचं पारणं फेडणारी आहेत.

    नवी दिल्ली:  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील राजारहाट येथे राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या (NSG-National Security Guard) नवीन इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की ‘आमचं धोरण कोणत्याही किंमतीत दहशतवाद सहन न करण्याचं आहे आणि त्यामध्ये एनएसजीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे’ ते पुढे म्हणाले की, ‘ज्यांना देश फोडून शांतता भंग करायची आहे त्यांना एनएसजीच्या अस्तित्वाची भीती वाटली पाहिजे. जर हे लोक यापुढे थांबले नाहीत तर एनएसजीची जबाबदारी आहे की त्यांचा सामना करा आणि त्यांना पराभूत करा.’ 10,000 वर्षांच्या इतिहासात भारताने कधीही कोणावर हल्ला न केल्याची आठवणही यावेळी गृहमंत्र्यांनी करून दिली. भारतीय जवांनाची प्रात्यक्षिकं पाहताना डोळ्यांचे पारणे फिटतं. देशाबद्दल असणारा अभिमान आणि प्रेम त्यांच्या प्रत्येक कृतीमधून झळकत असतं. (संबधित- बंगालमध्ये अमित शाह म्हणाले, खबरदार! भारतावर हल्ला कराल तर घरात घुसून मारू) NSG च्या जवानांनी युद्धाचा सराव देखील केला. एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की थक्का व्हाल. एनएसजीच्या जवानांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांमुळे अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. एनएसजीचे जवान दोरीच्या साहाय्याने इमारतीवर चढताना पाहायला मिळाले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत 16 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अन्य बातम्या दिल्ली हिंसाचार : चिमुकलीच्या बोबड्या बोलांनी तरी दिल्ली शांत होईल? पाहा VIDEO CAA विरोधातल्या हिंसाचारात दिल्लीनंतर या राज्यातही 2 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या