बंगालमधल्या प्रचार सभेत अमित शहांनी केलं नागरिकत्वाबद्दल हे मोठं वक्तव्य

बंगालमधल्या प्रचार सभेत अमित शहांनी केलं नागरिकत्वाबद्दल हे मोठं वक्तव्य

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पश्चिम बंगालमध्ये या वेळी पूर्ण ताकद पणाला लावल्याचं निवडणूक प्रचारावरून दिसतंय. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी इथल्या सभेत नागरिकत्व बिलाबद्दल मोठं वक्तव्य केलं.

  • Share this:

रामपूरहाट (प. बंगाल), 22 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पश्चिम बंगालमध्ये या वेळी पूर्ण ताकद लावत निवडणूक प्रचार दणक्यात सुरू केला आहे. पश्चिम बंगाल आणि ओरिसा यामधून भाजपला चांगला मतदारांचा चांगला कौल मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. त्यादृष्टीने भाजपने रणनीती आखल्याचं प्रचारावरून स्पष्ट होत आहे. बंगालच्या बिरभूम जिल्ह्यात रामपूरहाट इथे भाजप अध्यक्ष अमित शहा यांची सभा झाली. तेव्हा त्यांनी तृणमूल काँग्रेसवर आणि त्या पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला केला.

अत्यंत आक्रमक शैलीत केलेल्या या भाषणात अमित शहा म्हणाले, "संपूर्ण देशात, विशेषतः प. बंगालमध्ये भाजपची लाट आहे, हे मतदानाच्या दोन टप्प्यांनंतर स्पष्ट झालं आहे. पहिल्या दोन टप्प्यांतच ममता दीदींना त्यांची हार दिसू लागली आहे. त्यामुळे नैराश्यातून त्या विरोधकांबरोबर निवडणूक आयोगावरही बेछूट आरोप करत आहेत."

"भाजपवर आरोप करण्याआधी आणि भाजपला दहशतवादी संघटना असं संबोधून त्या तृणमूलची भिकार मानसिकता दाखवून देत आहेत. ममता दीदी, तुमचं ओमर अब्दुल्लांच्या टिपणीवर काय मत आहे ते आधी सांगा", असंही त्यांनी ममता बॅनर्जींना आव्हान दिलं.

बंगाल, आसाम या प्रांतांमध्ये सर्वाधिक चर्चा असणाऱ्या नागरिकत्त्व बिलासंदर्भात बोलताना अमित शहा यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. "आम्ही प्रथम नागरिकत्व कायदा बदल आणणार आणि शेजारी देशातल्या हिंदू, शीख, जैन आणि ख्रिश्चन अशा अल्पसंख्य आश्रितांना नागरिकत्व देणार. त्यानंतर आम्ही NRC आणून घुसखोरांना देशाबाहेर हुसकून लावणार", असं शहा म्हणाले. ममता दीदींनी बंगाली संस्कृती बिघडवली. एकीकडे मोदीजी दुर्गापूजा उत्सव UNESCO च्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर दीदी सरस्वती पूजा, रामनवमी, विजया दशमी अशा हिंदू सणांवर बंदी घालत आहेत, असा आरोप अमित शहा यांनी केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 07:41 PM IST

ताज्या बातम्या