नवी दिल्ली 27 जुलै: दहशतवादी (Terrorist) आणि त्यांना मदत करणाऱ्यांची आता काही खैर नाही. त्यांना सगळ्यात मोठा दणका देण्यासाठी अमित शहा (Amit Shah) यांच्या गृहमंत्रालयाने (Home Ministry) एक मोठा निर्णय घेतला आहे. अशा देशविघातक लोकांच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली असून त्या टीमला Special 44’ हे नाम देण्यात आलं आहे. यात सगळ्या महत्त्वाच्या संस्थांचे 44 अधिकारी राहणार आहेत. ते अशा लोकांची पाळमूळं शोधून ते उद्धवस्त करण्याचं काम करणार आहेत.
Unlawful Activities (Prevention) Actनुसार ज्या लोंकावर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत अशा लोकांवर ही टीम कारवाई करणार आहे. देशात दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या सर्व लोकांवर ही टीम नजरही ठेवणार आहे.
या टीममध्ये 44 स्पेशल अधिकारी असणार आहेत. त्यात इंटेलिजन्स ब्यूरो(IB), फायनांशियल इंटेलिजन्स (FIU), RBI, गृह मंत्रालय, सेबी, राज्यांचं ATS, CID, सह इतर विभागही सहभागी असणार आहेत. UAPA कायद्यानुसार गुन्हे नोंदविलेल्या लोकांवर हे पथक नजर ठेवणार आहे.
शिवसेनेचं अध:पतन; उद्धव ठाकरेंचं वक्तव्य हा ढोंगीपणा, विहिंपची सडकून टीका
असे देशविघातक लोक विविध नावाने बनावट अकाउंट्स उघडून आपली कामं सुरु ठेवत असतात. अशा लोकांच्या मुसक्या आता आवळल्या जाणार आहेत.
UNने दहशतवादी म्हणून घोषीत केलेल्यांची यादी विदेश मंत्रालय केंद्रीय गृहमंत्रालयाला देणार आहे. गृहमंत्रालय ही यादी या 44 अधिकाऱ्यांच्या पथकाला देणार आहे. हे अधिकारी राज्य सरकारांच्या मदतीने अशा लोकांवर नजर ठेवणं, त्यांची संपत्ती जप्त करणं, त्यांचे बँक खाते सील करण्यासह त्यांचे सर्व आर्थिक स्रोत बंद करण्याचं काम करणार आहे.
नेपाळनंतर बांग्लादेशाने अयोध्या राममंदिराबाबत केलं वक्तव्य
UAPA कायद्यानुसार गृहमंत्रालयाने आत्तापर्यंत दाऊद इब्राहिम, मसूद अजहर, जाकिर-उर-रहमान लखवी आणि हाफिज सईद यांना दहशतवादी म्हणून घोषीत केलं आहे. त्याच बरोबर 9 खालिस्तानी दहशतवाद्यांनाही त्या यादीत टाकलेलं आहे.
छुप्या आर्थिक बळावरच या लोकांच्या कारवाया सुरु असतात आता त्याच्याच मुळावर घाव घालण्याचं काम केंद्रीय गृहमंत्रालयाने हाती घेतलं आहे. त्यामुळे दहशतवादी संघटनांचा रसदपुरवढा बंद होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah