अमित शहांना गृहमंत्री करणं भाजपला पडतंय महागात?

अमित शहांना गृहमंत्री करणं भाजपला पडतंय महागात?

भाजपचे चाणक्य अमित शहांना पंतप्रधान मोदींनी दुसऱ्या टर्ममध्ये गृहमंत्री केलं. मात्र, याचा फटका भाजपला विधानसभा निवडणुकीत बसल्याचं दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 25 ऑक्टोबर : लोकसभा निवडणुकीत भाजपची 2014 ची मोदी लाट 2019 मध्ये त्सुनामी झाली होती. सर्वच राजकीय पक्षांना दणका देत भाजपने केंद्रात एकहाती सत्ता मिळवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आखलेल्या रणनितीने पक्षाला पुन्हा एकदा मोठं यश मिळालं. त्यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. यात भाजप अध्यक्ष अमित शहांकडे गृहमंत्रीपद देण्यात आलं. त्यानंतर भाजपसमोर पक्षाची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न निर्माण झाला. गृह मंत्रालय सांभाळताना पक्षाला वेळ देणं अमित शहांना कठीण होऊ शकतं म्हणून जेपी नड्डा यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आलं. तर अमित शहांकडे पुढचे काही महिने भाजपचे अध्यक्षपद राहिल असा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, लोकसभेनंतर 5 महिन्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुका झाल्या. त्यांचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यामध्ये दोन्ही राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपच्या जागा कमी झाल्या. अमित शहा मंत्रिमंडळात असल्याने पक्षासाठी पुरेसा वेळ देऊ शकले नाहीत आणि त्यामुळेच पक्षाची पिछेहाट झाली का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्रात 288 जागांपैकी भाजपने 105 जागा जिंकल्या. दुसरीकडे हरियाणात 40 जागांवर समाधान मानावं लागलं. दोन्ही राज्यात भाजप नंबर एकचा पक्ष ठरला पण स्वबळावर सरकार स्थापन करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. दोन्ही राज्यामध्ये 2014 च्या तुलनेत कमी जागा भाजपला मिळाल्या. 2014 मध्ये भाजपला महाराष्ट्रात 122 जागा होत्या. त्यावरून आता 112 जागा झाल्या आहेत. तर हरियाणात 47 वरून 40 जागा झाल्या.

केंद्रीय मंत्री होताच अमित शहा यांनी अनेक निर्णय घेतले. यामध्ये काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरला. भाजपकडून सातत्यानं कलम 370 ला विरोध केला जात होता. अमिच शहांनी फक्त निर्णय घेतला नाही तर त्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीही योग्य पद्धतीनं हाताळली. याशिवाय ट्रिपल तलाक आणि एनआरसीवरसुद्धा निर्णय घेतले गेले. महाराष्ट्रातील निवडणुकीत कलम 370 च्या मुद्यावर जोर देण्यात आला होता. विरोधकांनी काश्मीर मुद्दा महाराष्ट्राच्या निवडणुकीत काय कामाचा असा प्रश्नही विचारला होता.

वाचा : शिवसेना किंग होणार की किंगमेकर? मातोश्रीवर ठरणार नव्या सरकारचं भवितव्य

भाजपचे चाणक्य समजल्या जाणाऱ्या अमित शहांना 2014 च्या लोकसभे आधी उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली होती. तिथं 80 पैकी 71 जागांवर भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर जुलै 2014 मध्ये त्यांच्याकडे भाजपचे अध्यक्षपद सोपवण्यात आलं. त्यानंतर एकापाठोपाठ एक राज्य भाजपला जिंकून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. 2016 मध्ये त्यांची पुन्हा एकदा भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर 2019 ची लोकसभा निवडणूक भाजपसाठी न भूतो न भविष्यती अशीच ठरली.  दरम्यान, भाजपचे जेष्ठ नेते अरुण जेटली, सुषमा स्वराज यांच्या निधनाने पक्षात पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे शहांवर जबाबदारी वाढली आहे. आता केंद्रात मंत्री झाल्यानंतर अमित शहांचे पक्षाकडे होत असलेलं दुर्लक्ष राज्यातील निवडणुकांत कमी झालेल्या जागांवरून दिसत आहे.

वाचा : भाजप- शिवसेनेच्या वाटाघाटीत काय होणार? या आहेत 3 शक्यता

VIDEO : जेसीबी घेऊन उधळला गुलाल, सेनेच्या मंत्र्याला पराभूत केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते जल्लोष

First published: October 25, 2019, 10:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading