महाराष्ट्राच्या सत्ता कोंडीवर अमित शहांचं पहिलं विधान, आम्ही विश्वासघात केला नाही तर...

महाराष्ट्राच्या सत्ता कोंडीवर अमित शहांचं पहिलं विधान, आम्ही विश्वासघात केला नाही तर...

राज्यात सुरू असलेल्या सत्ता नाट्यावर भाजचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर: राज्यात सुरू असलेल्या सत्ता नाट्यावर भाजचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया मांडली आहे.  जर भाजप आणि शिवसेनेची महायुती विधानसभेमध्ये विजयी झाली तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं पंतप्रधान आणि मी काय म्हणत आलो. त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही. पण आता मात्र त्यांनी अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे अशा शब्दात अमित शहा यांनी शिवसेनेनं केलेला आरोप फेटाळला आहे.

शिवसेनेची ही मागणी मान्य नसल्याचंही अमित शहा यांनी म्हटलं आहे. ANI या वृत्तवाहिनीला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, 'राज्यपालांनी कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नाही. त्यांनी प्रत्येकाला समान वेळ दिला. महाराष्ट्रात 18 दिवस राज्यपालांनी वेळ दिली. विधानसेची वेळ संपल्यानंतर राज्यपालांनी पक्षांना निमंत्रण दिलं. राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी सगळ्यात जास्त वेळ दिला. सर्व पक्षांना पुरेसा वेळ देण्यात आला. ज्यांना सरकार स्थापन करायचं आहे त्यांच्याकडे आजही वेळ आहे' असं अमित शहा म्हणाले आहेत.

अमित शहा यांच्या प्रतिक्रियेती महत्त्वाचे मुद्दे

- विरोधी पक्ष या सगळ्यावर राजकराण करत आहेत. त्यांनी 2 दिवस मागितले त्यांना आता 6 महिन्यांची वेळ देण्याता आली आहे. त्यांनी सरकार स्थापन करावं. शिवसेनेला वेळ दिल्याचा तर हा पाचवा दिवस आहे.

- सत्ता स्थापन करण्यासाठी सगळ्यांकडे आता वेळ आहे. कपिल सिब्बलसारखे मोठे वकिल लहान मुलांसारखे बोलतात

- आम्ही कशाचीही चेष्ठा केली नाही. आमच्या मित्र पक्षाने ठेवलेल्या अटी आम्हाला मान्य नाही. आणि त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही

- राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे भाजपचं सगळ्यात मोठं नुकसान

- आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी तयार होतो शिवसेनेनं नकार दिला

- ज्यांच्याकडे सरकार आहे त्यांनी संख्याबळ दाखवून सराकर स्थापन करावं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2019 07:21 PM IST

ताज्या बातम्या