गांधीनगर, 14 नोव्हेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत, तर निवडणुकीचे निकाल 8 डिसेंबरला लागणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मैदानात उतरले आहेत. गुजरातमध्ये भाजपचा निश्चित विजय होईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.
गुजरातमध्ये भाजपला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळेल आणि भुपेंद्र पटेल हेच पुढचे मुख्यमंत्री होतील, असं अमित शाह म्हणाले आहेत. 'न्यूज 18 इंडिया'चा विशेष कार्यक्रम 'गुजरात अधिवेशन'मध्ये Network18 चे एमडी आणि ग्रुप एडिटर-इन-चीफ राहुल जोशी यांनी अमित शाह यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये अमित शाह यांनी राम मंदिराच्या लोकार्पणाचा मुहूर्तही सांगितला.
'आम्ही राम मंदिर बांधू, असं आश्वासन दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केलं, आता तिकीट काढून ठेवा, जानेवारी 2024 मध्ये भव्य राम मंदिर दिसेल,' असं अमित शाह म्हणाले. ट्रिपल तलाक संपवू सांगितलं, कलम 370 हटवलं. राम मंदिर, ट्रिपल तलाक, कलम 370 वेळी कोणती निवडणूक होती? असा सवाल अमित शाह यांनी विचारला. तसंच 2024 मध्येही देशात भाजपचं सरकार येईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
संजय राऊतांना अटक आणि जामीन, ईडीच्या कारवाईवर पहिल्यांदाच बोलले अमित शाह
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah