Home /News /national /

कोरोना विरुद्ध नरेंद्र मोदी सरकारने यशस्वी लढा दिला - अमित शहा

कोरोना विरुद्ध नरेंद्र मोदी सरकारने यशस्वी लढा दिला - अमित शहा

'लॉकडाऊनपूर्वी मजुरांची व्यवस्था करणं शक्य नव्हतं. ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था तयार नव्हती आणि राज्य सरकारे सुद्धा तयार नव्हती.'

    नवी दिल्ली 1 जून: देशात असलेलं कोरोनाचं संकट, केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारची वर्षपूर्ती या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘News18’ला सोमवारी Exclusive मुलाखत दिली.  कोरना व्हायरसचा प्रकोप, लॉकडाऊनमुळे मंदावलेली अर्थव्यवस्था आणि निर्माण झालेले प्रश्न यावर त्यांनी सरकारची भूमिका ठामपणे स्पष्ट केली. कोरोना व्हायरस विरुद्ध मोदी सरकारने यशस्वी लढा दिला असंही ते म्हणाले. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये सत्तेवर येताच अमित शहांनी अनेक धाडसी निर्णय घेत भाजपच्या अजेंड्यातले अनेक निर्णय प्रत्यक्षात आणले. काश्मीरमधून 370वं कलम हटवणं,शेजारच्या देशातून भारतात आलेल्या अल्पसंख्याक लोकांना भारताचं नागरिकत्व देणं, राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावणं असे धाडसी निर्णय त्यांनी घेतले. त्यावरून देशभर वादळ निर्माण झालं. मात्र त्यांनी कठोरपणे त्याची अंमलबजावणी केली. अशा सगळ्या प्रश्नांवर त्यांनी बेधडकपणे या मुलाखतीत भाष्य केलं. Network18चे समुह संपादक राहुल जोशी यांनी  अमित शहांची मुलाखत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सहा वर्षांमध्ये आधुनिक भारताचा पाया घातला असं मत त्यांनी व्यक्त केलं. अमित शहा म्हणाले, अमित शहा म्हणाले गेल्या 70 वर्षात झाली नाहीत असे अनेक धाडसी निर्णय मोदी सरकारने घेतले आहेत.  70 वर्षात लोकांनी अनेक मागण्या केल्या होत्या मात्र त्या पूर्ण करण्याचं धाडस कुठल्याही सरकारने दाखवलं नाही. मात्र मोदी सरकारने ते प्रश्न मार्गी लावले आहेत. सामाजिक, आर्थिक, राजकीय, देशाची सुरक्षा, शेतकरी, कामगार, गरीब अशा सगळ्या वर्गासाठी मोदी सरकारने अनेक कामे केली आहेत. देशाचा पाया मजबूत केल्याने त्यावर तयार होणारी इमारतही तशीच मजबूत होईल असंही त्यांनी सांगितलं. कोरोना व्हायरस विरुद्ध मोदी सरकारने यशस्वी लढा दिला असंही ते म्हणाले. अमित शहा म्हणाले, केंद्र सरकारने ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली त्यामुळे कोरोना व्हायरसला आम्हाला रोखता आलं. जगातली आणि भारताची स्थिती याची तुलना केली तर भारताने खूप चांगल्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळली असं त्यांनी सांगितलं. सरकारचं काम आणि आकडेवारी ही भारताची बाजू स्पष्ट करते. जगातले सगळे देश आज भारताच्या मॉडेलकडे पाहात आहेत. लॉकडाऊनपूर्वी मजुरांची व्यवस्था करणं शक्य नव्हतं. ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था तयार नव्हती आणि राज्य सरकारे सुद्धा तयार नव्हती त्यामुळे मजुरांना आधीच पाठवणे शक्य नव्हते असं मत अमित शहांनी व्यक्त केलं. मजुरांना जे कष्ट भोगावे लागले त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत असंही ते म्हणाले.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Amit Shah

    पुढील बातम्या