लष्कराचा अपमान करणं हेच विरोधकांचं धोरण - अमित शहा

'मोदींमुळे त्यांना पराभवाची भीती वाटते आणि मोदींना हटविण्याचे ते स्वप्न पाहत आहेत.'

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 10:16 PM IST

लष्कराचा अपमान करणं हेच विरोधकांचं धोरण - अमित शहा

आग्रा 24 मार्च : लष्कराचा अपमान करणं हीच आता विरोधी पक्षांची ओळख झालीय. 2019 ची निवडणूक ही विकास विरुद्ध भ्रष्टाचार अशी आहे. एका बाजूला विकासपुरूष मोदी आहेत तर दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचारी महाआघाडी असा हल्लाबोल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला. उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथं झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

अमित शहा म्हणाले, महाआघाडीच्या नेत्यांमध्ये निवडणूक लढण्याची हिंम्मत नाही. शरद पवार असो किंवा मायावती, ममत बॅनर्जी असो की स्टालिन यांना निवडणूक लढण्याविषयी जेव्हा विचारलं जातं तेव्हा ते हात वर करतात. मोदींमुळे त्यांना पराभवाची भीती वाटते आणि मोदींना हटविण्याचे ते स्वप्न पाहत आहेत.

व्होट बँकेच्या राजकारणासाठी राहुल किती खालची पातळी गाठणार? मतांसाठी देशच्या सुरक्षेशी खेळ करू नका. सोनिया-मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या 10 वर्षाच्या काळात वारंवार हल्ले झाले पण सरकारने अतिरेक्यांविरुद्ध कुठलीही कारवाई केली नाही.

उत्तर प्रदेशात 20 वर्ष सपा-बसपाचं सरकार होतं. सगळ्यांनी फक्त जाती-पातीचं राजकारण केलं. उत्तर प्रदेशच्या विकासासाठी काहीच केलं नाही. अखिलेश आणि मायावतींनी विकासाचा विचारही केला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 10:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...