भाजपमुळे आणीबाणीसारखी परिस्थिती, कृपा करून मोदींना हद्दपार करा; ममता बॅनर्जी भडकल्या

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष चिघळला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 15, 2019 10:22 PM IST

भाजपमुळे आणीबाणीसारखी परिस्थिती, कृपा करून मोदींना हद्दपार करा;  ममता बॅनर्जी भडकल्या

कोलकाता, 15 मे : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष चिघळला आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं येथे  17 मे ऐवजी 16 मे रोजीच प्रचारबंदी लागू केली आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रमकपणे पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला. शिवाय निवडणूक आयोगानं केलेल्या कारवाईवरही त्या भडकल्या आहेत. 'पश्चिम बंगाल म्हणजे बिहार किंवा काश्मीर नव्हे. भाजपमुळे येथे आणीबाणीसारखी परिस्थिती आहे', अशा शब्दांत ममता दीदींनी भाजपवर निशाणा साधला आहे. अमित शहांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोगानं कारवाईचा निर्णय घेतल्याचा थेट आरोपही ममतांनी केला आहे.

वाचा :गांधी घराण्याच्या या बालेकिल्ल्यावर सोनियांसमोर आव्हान काँग्रेसच्याच नेत्याचं

पुढे त्या असंही म्हणाल्या की, 'हा सर्व कट आताचे भाजप नेते आणि माजी तृणमूल काँग्रेस नेते मुकुल रॉय यांनी रचला आहे. केंद्रीय सुरक्षा दलामुळे हिंसाचार झाला आहे. दोषींविरोधात निवडणूक आयोग कारवाई करत नाहीय. अमित शहा निवडणूक आयोगाला धमकावत आहेत. मोदींनी तर आपल्या जाहीरसभेत ईश्वर चंद्र विद्यासागर यांच्या प्रतिमेच्या झालेल्या विटंबनेबाबत निषेधही व्यक्त केला नाही', असे सलग आरोप ममता दीदींनी पत्रकार परिषदेदरम्यान केले.

वाचा :VIDEO : प्रियांका गांधींच्या रॅलीत भाजप कार्यकर्त्यांचा राडा, एक जण जखमी

'भगव्या वस्त्रात गुंड'

Loading...

भगव्या वस्त्रात बंगालमध्ये गुंड आले आहेत. अमित शहा आणि नरेंद्र मोदी मला घाबरू लागले आहेत. नरेंद्र मोदी बंगालच्या जनतेला घाबरू लागले आहेत. अमित शहांना निवडणूक आयोगानं नोटीस दिली आहे का? भाजप बंगाल आपल्या इशाऱ्यावर चालवू शकत नाहीत, अशा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.

पश्चिम बंगालमध्ये एक दिवसापूर्वीच प्रचारबंदी


पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत निवडणूक आयोगानं नाराजी व्यक्त करत मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी (14 मे) कोलकातामध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं कठोरातील कठोर पाऊल उचललं आहे. निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी (16 मे) रात्रीपासूनच प्रचारबंदी लागू केली आहे. या कारवाईनुसार रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही पक्षाला येथे प्रचार करता येणार नाही. लोकसभा निवडणूक 2019च्या अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया 19 मे रोजी पार पडणार आहे. पण पश्चिम बंगालमधील हिंसाचार पाहता आयोगानं 17 मे ऐवजी 16 मे रोजीच प्रचारबंदी लागू केली आहे.

वाचा :VIDEO : भाजपला उत्तर देत ममतादीदीही उतरल्या रस्त्यावर

कलम 324 अंतर्गत निवडणूक आयोगानं ही कारवाई केली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोगानं केलेली ही मोठी कारवाई असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.  याव्यतिरिक्त निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालच्या मुख्य आणि गृह सचिवांचीही पदावरून गच्छंती केली आहे.

कोलकात्यात अमित शहांच्या गाडीवर हल्ला, भाजप आणि तृणमूलमध्ये तुफान राडा


मंगळवारी कोलकात्यामध्ये अमित शहांच्या रोड शोदरम्यान त्यांच्या वाहनावर हल्ला झाल्याने तुफान राडा झाला. तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, दगडफेक झाली. अनेक ठिकाणी जाळपोळही करण्यात आली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं होतं. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

भाजपने अमित शहा यांच्या रोड शोची कोलकात्यात घोषणा केल्यापासूनच तृणमूल आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली होती. सात किलोमीटरच्या या रोड शोला सुरुवातीला परवानगी दिली गेली नाही. अगदी शेवटच्या क्षणी रोड शोला परवानगी मिळाली होती. रोड शो सुरू झाल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले त्यानंतर संघर्षाला सुरुवात झाली.

दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने वातावरण चिघळलं. त्यातच अमित शहा आणि भाजपचे नेते ज्या गाडीवर उभे होते त्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याने वातावरण आणखीच तापलं. यादरम्यान, पोलिसांनी अमित शहा आणि इतर नेत्यांना सुरक्षित पुढे नेलं.

VIDEO: 'तू झक्कास दिसतेस' म्हणताच तरुणीने युवकाला चपलेनं धुतलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 15, 2019 09:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...