बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असून कायम चर्चेत असतात. हे कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसह अन्य अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असतात. अभिनेता विद्युत जामवालही सध्या अशाच कारणांनी सोशळ मीडियावर चर्चेत आहे..
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एक मोठी कबुली दिलीय. 'गोली मारो', भारत - पाक मॅच अशी वक्तव्यं आम्ही करायला नको होती, असं ते म्हणाले.
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एक मोठी कबुली दिलीय. 'गोली मारो', भारत - पाक मॅच अशी वक्तव्यं आम्ही करायला नको होती, असं ते म्हणाले. पक्षाच्या नेत्यांनी अशी वक्तव्य केल्याने भाजपचं या निवडणुकीत मोठं नुकसान झालं असावं, असंही अमित शहा म्हणाले. आम्ही विजय किंवा पराभव यासाठी निवडणूक लढवत नाही. कोणतंही सरकार बनवणं किंवा पाडणं हा आमचा उद्देश नसतो. भाजप एका विचारसरणीसाठी निवडणूक लढतं, असंही त्यांनी सांगितलं. दिल्लीच्या निवडणुकीत माझा अंदाज चुकला, अशी कबुलीही त्यांनी दिली.
'अतिरेकी मतं देऊ नयेत'
कुणीही अतिरेकी पद्धतीने मतप्रदर्शन करू नये, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. ते देशासाठी विघातक आहे. त्यामुळेच आम्ही शाहीनबाग आंदोलनात अशी वक्तव्यं करणाऱ्या शर्जिल इमामला अटक केली, असं अमित शहांनी सांगितलं. दिल्लीमधल्या शाहीनबागच्या आंदोलकांना तुम्ही भेटणार आहात का? या प्रश्नावर ते म्हणाले, सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल ज्यांना चर्चा करायची आहे त्यांनी माझ्या कार्यालयाकडून वेळ मागून घ्यावी. आम्ही 3 दिवसांच्या आत त्यांना वेळ देऊ.
(हेही वाचा : जावई माझा भला, नारायण मूर्तींचे जावई ऋषी सुनाक बनले ब्रिटनचे अर्थमंत्री)
या आंदोलकांना जसं त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे तसाच आम्हालाही आमचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, असं अमित शहा म्हणाले. काँग्रेसने धर्माच्या नावाखाली देशात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. शाहीनबाग आंदोलन आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा काही संबंध आहे का, याचा आम्ही तपास करतोय, असंही त्यांनी सांगितलं.
=====================================================================================
Published by:Arti Kulkarni
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.