S M L

अमित शहा-मुख्यमंत्र्यांची उद्या दिल्लीत बैठक, राणेंच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरणार ?

विशेष म्हणजे, अमित शहा प्रत्येक भाजपशासीत मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्रपणे बैठक घेणार आहे.

Sachin Salve | Updated On: Aug 21, 2017 02:11 PM IST

अमित शहा-मुख्यमंत्र्यांची उद्या दिल्लीत बैठक, राणेंच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरणार ?

21 आॅगस्ट : भाजप अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे.

पावसाळी अधिवेशनात भाजपवर चोहीबाजूने झालेल्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांची चांगलीच दमछाक झाली. आता दिल्लीत अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना बोलावून घेतलंय. उद्या मंगळवारी शहा आणि फडणवीस यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच राज्यातील भाजपची स्थिती, शिवसेना संबंध या सगळ्या विषयावर चर्चा होणार असल्याचं कळतंय. याच बैठकीमध्ये केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराची चर्चा होईल आणि याच बैठकांमध्ये होणाऱ्या निर्णयांमधून महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची दिशा ठरेल , अशी चिन्हे सध्यातरी दिसताहेत.

विशेष म्हणजे, अमित शहा प्रत्येक भाजपशासीत मुख्यमंत्र्यांसोबत स्वतंत्रपणे बैठक घेणार आहे.(संग्रहित छायाचित्र)

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 01:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close