अमित शहांच्या महत्त्वकांक्षी विधेयकाच्या बाजूने 293 तर विरोधात 82 मते

अमित शहांच्या महत्त्वकांक्षी विधेयकाच्या बाजूने 293 तर विरोधात 82 मते

महाराष्ट्रात युती तोडल्यानंतर केंद्रात सेनेच्या एकमेव मंत्र्यांने राजीनामा दिल्यानंतर या विधेयकावेळी सेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिलं होतं. शिवसेनेनं विधेयकाच्या बाजूने मतदान केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 डिसेंबर: हिवाळी अधिवेशनात सर्वात चर्चेचं असणारं विधेयक म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक अमित शाहांनी संसदेत सादर केलं.नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत मतदान घेण्यात आलं. यामध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने 293 मते तर विरुद्ध 82 मते पडली. महाराष्ट्रात युती तोडल्यानंतर केंद्रात सेनेच्या एकमेव मंत्र्यांने राजीनामा दिल्यानंतर या विधेयकावेळी सेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिलं होतं. शिवसेनेनं विधेयकाच्या बाजूने मतदान केलं आहे.

दरम्रायान, ष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या खासदारांनी विधेयक सादर करत असताना गोंधळ घातला. मात्र या गदारोळातच अमित शाह यांनी विधेयक सादर केलं. विधेयकाविरोधात काँग्रसकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून धार्मिक अत्याचारामुळे 2014 पर्यंत देश सोडून भारतात अलेल्या लोकांना हे नागरिकत्व मिळेल. यामध्ये हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारशी धर्मातील लोकांचा समावेश असेल. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणारे नागरिकत्व सुधारणा विधेयक सादर करण्यात आलं.

सभात्याग न करण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना केलं आहे. तर हे विधेयक घटनेच्या तत्वाविरोधात असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.

याआधी हे विधेयक आधीच्या लोकसभेतसुद्धा मांडले होते. पण विरोधकांनी लोकसभेत गदारोळ घातला होता आणि विधेयकाला मंजुरी मिळाली नव्हती. धार्मिकतेच्या आधारावर मतभेद करण्यात येत असल्याचं विरोधकांनी आरोप केले होते. तेव्हा लोकसभेची मुदत संपल्याने विधेयकही रद्दबातल झाले. या विधेयकाला आसामसह ईशान्य भारतामधून मोठा विरोध केला जात आहे.ईशान्य भारतात झालेल्या विरोधामुळे हे विधेयक राज्यसभेत मांडले गेले नव्हते. या विधेयकाचा निषेध म्हणून ईशान्य भारतात मंगळवारी 10 डिसेंबरला 11 तासांचा बंद पुकारण्यात येणार आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Published by: Kranti Kanetkar
First published: December 9, 2019, 1:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading