नवी दिल्ली, 10 जून : गृहमंत्री अमित शहा यांनी अंतर्गत सुरक्षेच्या मुद्यावर महत्त्वाची बैठक बोलावली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल देखील या बैठकीला हजर आहेत. सुरक्षेच्या मुद्यावर आणि पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर अमित शहा यांची गृहमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, अजित डोवल यांना कॅबिनेटचा दर्जा देत त्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्ल्लागारपदी कायम ठेवण्यात आलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार
पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले. त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. या हिंसाचारानंतर पश्चिम बंगालमध्ये तणावाचं वातावरण आहे. केंद्रानं देखील या परिस्थितीची दखल घेतली आहे. केंद्र सरकारनं या प्रकरणामध्ये अॅडव्हायझरीची नेमणूक देखील केली आहे.
Operation All Out : दहशतवाद्यांचं ‘गुप्त’ ठिकाण भारतीय सैन्यानं केलं उद्धवस्त
राज्यपाल घेणार पंतप्रधानांची भेट
दरम्यान, पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांना परिस्थितीची माहिती देणार आहेत. पण, राज्यपालांनी मात्र या बातमीचं खंडन केलं आहे. पंतप्रधानांना रिपोर्ट किंवा माहिती देण्यासाठी ही भेट नसून त्यांचं अभिनंदन करण्यासाठी भेट घेणार असल्याचं केशरीनाथ त्रिपाठी यांनी म्हटलं आहे.
भाजप – TMCमध्ये तणाव
सध्या भाजप आणि तृणमुल काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये देखील दोन्ही पक्षाचे नेते अमित शहा यांच्या रॅलीदरम्यान भिडले होते. त्यानंतर पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले असून राज्यात तणावाची स्थिती आहे.
VIDEO : मुंबईच्या रस्त्यावर स्टंट करत मद्यपींचा धुमाकूळ