• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • अमित शहांनी उद्धव ठाकरेंना तब्बल 8 वेळा केले फोन, कारण...!

अमित शहांनी उद्धव ठाकरेंना तब्बल 8 वेळा केले फोन, कारण...!

अखेर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर दिल्लीला जाण्यासाठी चाटर्ड जेट मधून निघाले आहेत.

  • Share this:
मुंबई, 21 मे : लोकसभेसाठी मतदान झाल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजामुळे सत्ताधारी भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जवळ जवळ सर्वच एक्झिट पोलने एनडीएला 300पेक्षा अधिक जागा मिळतील अशा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी एनडीएच्या नेत्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. 'NDA' च्या या शाही डिनरसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच यावं असा आग्रह होता. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर तब्बल 8 वेळा फोन केले अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अखेर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर दिल्लीला जाण्यासाठी चाटर्ड जेट मधून निघाले आहेत. दिल्ली विमानतळावर 6:30 वाजता उतरतील आणि 7:30 पर्यंत अशोका हॉटेलमध्ये पोहचणार आहेत. त्यामुळे शंहाच्या या शाही डिनरची सध्या भलतीच चर्चा आहे. शहांच्या या शाही डिनरसाठी एनडीएतील सर्व पक्षांचे प्रमुख निकालाआधी दिल्लीत एकत्र येणार आहेत. या भोजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित असणार आहेत. पण एनडीएतील भाजपनंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देखील हजेरी लावणार असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष या डिनर पार्टीकडे असणार आहे. हेही वाचा : धक्कादायक! आमदारासह कुटुंबातील 11 जणांची एकाच वेळेस निर्घृण हत्या मतदान झाल्यानंतर उद्धव ठाकरे सहकुटुंब परदेश दैऱ्यावर केले होते. आज सकाळी ते मुंबईत दाखल झाले आहेत. आज त्यांची सेनेच्या नेत्यांसोबत बैठक आहे. त्यामुळे शहांच्या डिनरसाठी शिवसेनेकडून कोण जाणार याबाबत संभ्रम होता. उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर दिल्लीला निघाले आहेत. उद्धव ठाकरेंसाठी पुरणपोळी बेत पण... सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये संध्याकाळी 7.30 वाजता भोजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. भाजपकडून एनडीएतील नेत्यांची आवड-निवड विचारात घेऊन जेवणाचा मेन्यू ठरवण्यात आला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी अमित शहा यांनी पुरणपोळीचा मेन्यू ठरवण्यात आला आहे. शहा यांनी या शाही भोजनात 35 प्रकारच्या पदार्थांचा समावेश केला आहे. यात प्रत्येक नेत्यांच्या आवडी-निवडीचा विचार करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींसाठी खास गुजराती डीश ठेवण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यासाठी खास बिहारी चोखा, सत्तू हा मेन्यू ठेवण्यात आला आहे. ईशान्येकडील नेत्यांसाठी खास त्यांच्या आवडीचे पदार्थ तर अकाली दलाच्या नेत्यांसाठी पंजाबी तडका असणारे पदार्थ ठेवण्यात आले आहेत. शाही डिनरची शाही चर्चा... निकालाच्या आधी बोलवण्यात आलेल्या भोजन कार्यक्रमामागे एनडीएतील सर्व पक्ष एकत्र आहेत असा संदेश देण्याचा हेतू असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. SPECIAL REPORT : मोदींची त्सुनामी, सट्टा बाजारात आला भूकंप!
First published: