भाजप बंगाल विरोधी नाही तर ममता विरोधी, अमित शहांचं ममता बॅनर्जींवर जोरदार टीकास्त्र

भाजप बंगाल विरोधी नाही तर ममता विरोधी, अमित शहांचं ममता बॅनर्जींवर जोरदार टीकास्त्र

बांगलादेशी घुसखोरांना ममता बॅनजी अभय देत असल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहांनी केला आहे.

  • Share this:

कोलकत्ता, 12 ऑगस्ट : बांगलादेशी घुसखोरांना ममता बॅनजी अभय देत असल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहांनी केला आहे. पश्चिम बंगालला बांगलादेशी घुसखोरांनी पोखरलंयं ते ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसमुळेच असं देखील ते म्हणाले आहेत. आज तृणमूल काँग्रेसकडून भाजपविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली होती. यावरून शहा यांनी ममता बॅनर्जींच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. यावेळी भाजप हे बंगाल विरोधी नसून ते ममता विरोधी असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान आमच्या पक्षाची सुरुवातच शामाप्रसाद मुखर्जी यांनी केली मग भाजप बंगाल विरोधी कसा असेल असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच एनआरसी कायद्यामुळे शरणार्थींना कोणताही धोका होणार नाही, याची आपण ग्वाही देतो, असेही शहा म्हणाले.

आमच्यासाठी देश प्रथम, वोटबँक नंतर येते. पण आज वोटबँक पॉलिटिक्सवर काँग्रेस गप्प आहे. असं म्हणत शहा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

बांगलादेशी घुसखोरच तृणमूल काँग्रेसची वोटबँक असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, सकाळी शहा यांच्या सभेसाठी कार्यकर्त्यांना आणायला गेलेल्या बसवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. तसेच तृणमूल काँग्रेसकडून पोस्टरबाजीही करण्यात आली होती. यावरून शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. आपली सभा राज्यातील जनतेने न पाहण्यासाठी चॅनेलवरही बंदी आणल्याचा आरोप त्यांनी केला.

संसदेमध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी)वर चर्चा होत असताना ममता त्याला विरोध करत होत्या. आसाममधील घुसखोरांना खड्यासारखे निवडून बाजुला करण्यात येणार आहे. ममता यांच्या विरोधामुळे ही प्रक्रिया थांबणार नाही. ममता कोणत्या उद्देशाने बांगलादेशी घुसखोरांना छत्रछाया देत आहेत. काँग्रेसनेही याबाबत आपली भुमिका स्पष्ट करावी, असे आव्हान शहा यांनी आज दिलं.

तसंच वोटबँकमुळे राहुल गांधी यावर बोलत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. ममता आणि काँग्रेसने देशाला प्रथम स्थान की वोटबँकेला ते आधी स्पष्ट करावं. एनआरसी कायद्यामुळे शरणार्थींना कोणताही धोका होणार नाही, याची आपण ग्वाही देतो, असेही शहा म्हणाले.

First published: August 12, 2018, 11:37 AM IST

ताज्या बातम्या