News18 Lokmat

अमित शहांचे राहुल गांधींना 3 प्रश्न; म्हणाले, 'उत्तर द्या नाहीतर शहिदांची माफी मागा'

दहशतवादाशी लढण्याची काँग्रेसची अधिकृत पॉलिसी काय? एअर स्ट्राईक न करता शांततामय चर्चा करणं हे काँग्रेसचं अधिकृत धोरण आहे का, अशा थेट सवाल अमित शहांनी राहुल गांधींना करत या 3 प्रश्नांची उत्तर विचारली आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 10:00 PM IST

अमित शहांचे राहुल गांधींना 3 प्रश्न; म्हणाले, 'उत्तर द्या नाहीतर शहिदांची माफी मागा'

नवी दिल्ली, 23 मार्च : निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्तारूढ भाजप आणि विरोधक दोघांच्याही प्रचारांमध्ये एअर स्ट्राईकचा मुद्दा ठळकपणे येताना दिसतो आहे. एअर स्ट्राईकवरून सरकारला पुरावा मागितल्याबद्दल भाजपने काँग्रेसला जाब विचारला. आज अमित शहा यांनी त्यापुढे जात थेट राहुल गांधींवर प्रश्नांचा भडिमार करत हल्ला चढवला. दहशतवादाशी लढण्याची काँग्रेसची अधिकृत पॉलिसी काय? एअर स्ट्राईक न करता शांततामय चर्चा करणं हे काँग्रेसचं अधिकृत धोरण आहे का, अशा थेट सवाल अमित शहांनी विचारला आहे.

काँग्रेसवर नेम धरून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधींना माझे 3 प्रश्न आहेत, असं सांगितलं.


अमित शहांचे राहुल गांधींना 3 प्रश्न...

1.  राहुल गांधी सॅम पित्रोडा यांच्या म्हणण्याशी सहमत आहेत का? पुलवामा हल्ल्याची घटना त्यांनाही  routine incident आहे असं वाटतं का?

Loading...

2. काही थोड्या लोकांनी केलेल्या कृतीबद्दल साऱ्या देशाला जबाबदार धरता कामा नये, असं राहुल गांधी म्हणतात..  म्हणजे पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांचा भारतातल्या दहशतवादाशी काही संबंध नाही असं त्यांना म्हणायचं आहे का? दहशतवादी हल्ल्यांना पाकिस्तान नाही तर कोण जबाबदार याचं उत्त राहुल गांधींनी द्यायलाच हवं.

3. काँग्रेस म्हणतं - अशा दहशतवादी हल्ल्यांना एअर स्ट्राईक किंवा सर्जिकल स्ट्राईकने उत्तर देऊ नये तर शांततापूर्ण चर्चेतून मार्ग काढावा. मला सांगा राहुल गांधी - दहशतवादाशी लढण्यासाठी काँग्रेसचे ही अधिकृत धोरण आहे का?

मतपेटीचा विचार करून कुणाला तरी खुश करण्यासाठी राष्ट्रविरोधी वक्तव्य करणं हे काँग्रेसचे जुने खेळ आहेत. काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा आणि एकात्मतेच्या वर हे राजकीय मतपेटीची खेळी आहे. त्यांच्या या व्होट बँक पॉलिटिक्ससाठी आपल्या सुरक्षा दलांचा आणि कुटुंबीयांचा वापर करत काँग्रेसने स्वतःपुढच्याच अडचणी वाढवल्या आहेत, असं अमित शहा म्हणाले.


हे तीन प्रश्न विचारून अमित शङा म्हणाले, "काँग्रेस अध्यक्षांनी आपल्या सैनिकांची, शहिदांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची आणि साऱ्या देशाची माफी मागितली पाहिजे".

--

निवडणुकीआधीच अशोक चव्हाणांच्या 'या' ऑडिओ क्लीपने उडाली खळबळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 10:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...