लोकसभेत 'या' विषयावरून खडाजंगी! अमित शहा ओवैसींना म्हणाले,'तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल'

लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली.

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2019 05:17 PM IST

लोकसभेत 'या' विषयावरून खडाजंगी! अमित शहा ओवैसींना म्हणाले,'तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल'

नवी दिल्ली, 15 जुलै : लोकसभेमध्ये सोमवारी (15 जुलै) राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीला (NIA) अधिक मजबूत बनवणारे सुधारणा विधेयक मंजुर करण्यात आले. यापूर्वी यावर चर्चादेखील झाली. चर्चेदरम्यान भाजपचे खासदार सत्यपाल सिंह सरकारतर्फे बाजू मांडत असताना सभागृहात गोंधळ निर्माण झाला. त्यांच्या भाषणादरम्यान एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी विरोध दर्शवण्यास सुरुवात केली. यानंतर ओवैसी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल, असं सांगत शहा यांनी ओवैसी यांना खडसावलं.

लोकसभेत नेमकं काय झालं?

NIAसंबंधित विधेयकावर चर्चा सुरू असताना सत्यपाल सिंह यांनी म्हटलं की, 'दहशतवाद यासाठी वाढत आहे कारण आपण त्याकडे नेहमीच राजकीय दृष्टीकोनातून पाहतो. पण खरंतर आपण सर्वांनी मिळून याविरोधात लढलं पाहिजे. मुंबईनं प्रचंड दहशतवाद सहन केला आहे कारण येथेही याकडे राजकीय आरशातूनच पाहिलं गेलं आहे'.

सत्यपाल सिंह यांनी पुढे हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणाचा उल्लेख केला त्यावेळेस गोंधळ निर्माण झाला. ते म्हणाले की, 'हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी काही संशयित अल्पसंख्यांक समुदायाच्या नागरिकांना ताब्यात घेतले. त्यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना कारवाई करू नका नाहीतर तुमची नोकरी जाईल, असे म्हटलं होतं.

सिंह यांच्या या विधानावर ओवैसींनी आक्षेप नोंदवला. पण अमित शहांनी ओवैसींना खाली बसण्यास सांगितलं. शहा म्हणाले की, 'ओवैसी साहेब ऐकण्याचीही ताकद ठेवा. जेव्हा ए.राजा बोलत होते तेव्हा तुम्ही आक्षेप का नोंदवला नाही. असं नाही चालणार तुम्हाला ऐकून देखील घ्यावं लागेल'. यानंतर संसदेत गोंधळ सुरू झाला.

काही वेळानंतर शहा म्हणाले की, 'दोन सदस्य बोलत असताना अन्य कोणीही मध्ये बोलू नये. ए. राजा आणि सत्यपाल सिंह या दोघांचेही वेगवेगळे मुद्दे आहेत आणि मी कोणालाही घाबरवत नाहीय पण हीच गोष्ट जर तुमच्या मनात असेल तर त्यावर काय केलं जाऊ शकतं?, असा उलट प्रश्न शहा यांनी उपस्थित केला.

सेल्फी घेण्याच्या नादात मरता-मरता वाचला युवक, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 05:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...