भाजपचा उतावीळपणा, निवडणूक आयोगाच्या आधीच केल्या कर्नाटक निवडणुकीच्या तारखा जाहीर !

भाजपचा उतावीळपणा, निवडणूक आयोगाच्या आधीच केल्या कर्नाटक निवडणुकीच्या तारखा जाहीर !

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोमवारी रात्रीच कर्नाटक विधानसभेसाठी 12 मे रोजी मतदान आणि 18 मे रोजी मतमोजणी होणार असं टि्वट केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च : निवडणूक आयोगाने आज कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा केली. पण निवडणूक आयोगाच्या आधीच भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी तारखा जाहीर करून टाकल्यात. विरोधकांनी यावर आक्षेप घेतला असून तक्रार दाखल करणार आहे.

आज सकाळी कर्नाटकच्या 244 जागांसाठी मुख्य निवडणूक आयुक्त प्रकाश रावत यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. 12 मे रोजी मतदान आणि 15 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोमवारी रात्रीच कर्नाटक विधानसभेसाठी 12 मे रोजी मतदान आणि 18 मे रोजी मतमोजणी होणार असं टि्वट केलं. मालवीय यांचा अंदाज जरी चुकला असला तरी निवडणूक आयोगाच्या आधी टि्वट करण्याची घाई अंगाशी आलीये. आपल्या टि्वटमुळे वाद झाल्यानंतर मालवीय यांना आपलं टि्वट डिलीट केलं.

या प्रकारावरून काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासनियतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. भाजप आता सुपर इलेक्सन कमिशन झाली आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी अमित शहांना नोटीस पाठवावी आणि भाजपच्या आयटी सेलच्या प्रमुखांविरोधात एफआयआर दाखल केली पाहिजे अशी मागणी केलीये.

विशेष म्हणजे कर्नाटक काँग्रेसचे सोशल मीडिया प्रभारी श्रीवत्स यांनीही असंच टि्वट केलं होतं, पण नंतर त्यांनी ते डिलीट केलं होतं.

दरम्यान, निवडणूक आयोगाने याची दखल घेतली असून जर कुणी माहिती लिक केली असले आणि यात दोषी आढळला तर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं.

First published: March 27, 2018, 6:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading