मुलीला मारहाण करत होता बॉयफ्रेंड, 'अ‍ॅलेक्सा'ने पोलिसांना केला फोन

मुलीला मारहाण करत होता बॉयफ्रेंड, 'अ‍ॅलेक्सा'ने पोलिसांना केला फोन

तुम्हाला अ‍ॅमेझॉन कंपनीचं'अ‍ॅलेक्सा'हे डिव्हाइस माहीत असेल. ही अ‍ॅलेक्सा तुमच्याशी बोलू शकते. तुम्ही करायच्या कामांच्या नोंदी ठेवून तुम्हाला आठवण करून देते. याच अ‍ॅलेक्साने आणखी एक पाऊल पुढे जात एका मुलीच्या बॉयफ्रेंडविरुद्ध पोलिसांत तक्रारही केली!

  • Share this:

मेक्सिको, 13 जुलै : तुम्हाला अ‍ॅमेझॉन कंपनीचं'अ‍ॅलेक्सा'हे डिव्हाइस माहीत असेल. ही अ‍ॅलेक्सा तुमच्याशी बोलू शकते. तुम्ही करायच्या कामांच्या नोंदी ठेवून तुम्हाला आठवण करून देते, ट्रॅफिक, स्पोर्टस अशा विषयांचे अपडेट्सही तुम्हाला देते. याच अ‍ॅलेक्साने आणखी एक पाऊल पुढे जात एका मुलीच्या बॉयफ्रेंडविरुद्ध पोलिसात तक्रारही केली. 28 वर्षांचा एक मेक्सिकन तरुण त्याच्या गर्लफ्रेंडला मारहाण करत होता. तिचं दुसऱ्या कुणाशीतरी अफेअर सुरू आहे, असा त्याला संशय होता. त्याने या मुलीला इतकी मारहाण केली की ती मुलगी जबर जखमी झाली.

अ‍ॅड्युआर्डो बॅरोज असं या मारहाण करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. हा बॅरोज खूप चिडून या मुलीवर आरडाओरडा करू लागला. त्याने या मुलीला धमक्याही दिल्या आणि या घटनेबद्दल पोलिसांना सांगितलं तर याद राख, अशीही दमदाटी केली.

हे सगळं प्रकरण घड असताना पोलीस स्टेशनला एक फोन गेला. हा फोन या मुलीने तर केलेलाच नव्हता. पण तरीही पोलीस घरी आले आणि या तरुणाला अटक करून त्याला त्यांना गजाआड केलं.

VIDEO: स्माईल प्लिज सिनेमाच्या टीमसोबत खास गप्पा

घरामध्ये ही तरुणी आणि तिचा बॉयफ्रेंड याशिवाय कुणीच नव्हतं. मग तरीही पोलिसांनी ही माहिती कशी काय मिळाली? असा प्रश्न या तरुणीला पडला. त्यावर पोलिसांनी तिला सांगितलं, 'अ‍ॅलेक्सा' ने पोलिसांबद्दलचं त्या दोघांचं बोलणं ऐकलं आणि पोलिसांना फोन लावला.

अ‍ॅलेक्साने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांना या घरात काय चाललं आहे ते कळलं आणि त्यांनी लगेचच त्या तरुणाला अटक केली. हे कळल्यावर त्या मुलीलाही आश्चर्याचा धक्काच बसला.

अ‍ॅलेक्साने या मुलीला आतापर्यंत अनेक बाबतीत असिस्ट केलं असणार पण ती संकटात आहे हे ओळखून अ‍ॅलेक्सा ने पोलिसांना फोन लावला हे खरंच आपल्यालाही धक्का देणारं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली ही गॅझेट्स काही बाबतीत माणसांच्याही पुढे गेली आहेत,असंच म्हणावं लागेल.

===========================================================================================

SPECIAL REPORT : श्रीदेवीचा खून झाला असेल तर तो का आणि कशासाठी?

First published: July 13, 2019, 3:50 PM IST
Tags: amezon

ताज्या बातम्या