News18 Lokmat

Loksabha election 2019 अमेठीत पुन्हा रंगणार राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी यांच्यात सामना

2014 च्या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना अमेठीत जोरदार लढत दिली होती.

News18 Lokmat | Updated On: Mar 21, 2019 10:20 PM IST

Loksabha election 2019 अमेठीत पुन्हा रंगणार राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी यांच्यात सामना

अमेठी 21 मार्च : अमेठी हा गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ. भाजपने याही वेळी या मतदारसंघातून भाजपकडून स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली आहे. 2014 च्या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना जोरदार लढत दिली होती. याही निवडणुकीत हा सामना लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.

अमेठी हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ. राजीव गांधी यांनी या मतदारसंघाचं दीर्घकाळ प्रतिनिधीत्व केलं. नंतर सोनिया गांधी निवडून आल्या आणि आता राहुल गांधी हे या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजपने अमेठीतून स्मृती इराणींना तिकीट दिलं होतं. त्यांनीही तिथे जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमेठीत जाहीरसभाही घेतली होती.

2014 च्या निवडणुकीत  राहुल गांधी यांना 408,651 मतं मिळाली होती. तर स्मृती इराणींना 300,74 मतं. राहुल यांनी त्यांना 1,07,000 मतांनी हरवलं होतं. त्या आधी 2009 मध्ये ते 3,50,000 मतांनी जिंकले होते. गेली पाच वर्ष त्यांनी अमेठीत सातत्याने संपर्क ठेवला. मी अमेठीही मुलगी आहे अशी सादही त्यांनी घातली होती. अनेक प्रकल्पही केंद्राने अमेठीत आणले आहेत. त्यामुळे याहीवेळी सामना रंगणार आहे.

अमेठी लोकसभा मतदारसंघात अमेठी जिल्ह्यातल्या तिलोई, जगदीशपुर आणि अमेठी  तर रायबरेली जिल्ह्यातल्या गौरीगंज आणि सलोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या मतदारसंघात आत्तापर्यंत 16 निवडणूका आणि दोन पोटनिवडणुका झाल्या. यात 16 वेळा काँग्रेसने विजय मिळवला तर 1977 मध्ये लोकदल आणि 1998 मध्ये भाजपने ही जागा जिंकली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2019 10:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...